1 / 9कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक कंबर कसून प्रयत्न करत आहेत. तर, चीनमधील वैज्ञानिकांनी कोरोनासंदर्भात दिलेल्या इशाऱ्याने लोकांच्या मनातील भीती आणखी वाढवली आहे. चीनीमधील काही डॉक्टरांनी दावा केला आहे, की कोरोना बरा झाला तरीही, संबंधित रुग्णांना दीर्घ काळ आरोग्याच्या कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावाच लागेल.2 / 9डॉक्टरांना कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या आरोग्याचे व्यवस्थितपणे मॉनिटरिंग करता यावे. यासाठी, चीनच्या 'नॅशनल हेल्थ कमीशन'नेही बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.3 / 9या संशोधनात दावा करण्यात आला आहे, की कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये अधिकांश रुग्णांना फुफ्फुस, हार्ट डॅमेज, स्नायू आणि सायकोलॉजिकल डिसॉर्डर सारख्या समस्यांमध्ये उपचाराची आवश्यकता असते.4 / 9सरकारी आकडेवारीनुसार, चीनमध्ये आतापर्यंत 78,000 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.5 / 9डॉक्टर म्हणतात, कोरोनाने ज्या रुग्णांना अधिक गंभीर आजारी केले. त्यांना भविष्यातही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर हार्ट एरिथमिया अथवा एंझाइमचा दीर्घकाळ सामना करावा लागू शकतो.6 / 9कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये डिप्रेशन, इंसोमेनिया, ईटिंग डिसॉर्डर आणि तमाम विविध प्रकारचे मानसिक आणि न्यूरोलॉजिकल समस्या असतात. याशिवाय, त्यांचे स्नायू आणि बॉडी फंक्शनमध्येही विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 7 / 9मेडिकल जर्नल किडनी इंटरनॅशनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, नॉर्थवेल हेल्थ मेडिकल फॅसिलिटी (न्यूयॉर्क)ने 5,449 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे परीक्षण केले. यात तीन पैकी एका रुग्णात मृत्रपिंडाशी संबंधित गंभीर समस्या दिसून आली.8 / 9या संशोधनाचे प्रमूख आणि नॉर्थवेलमध्ये नेफ्रोलॉजीचे चीफ असोसिएट केनार झावेरी यांनी सांगितले, की 14.3 टक्के लोकांना डायलिसिसवर ठेवण्याची आवश्यकता असते.9 / 9तर कमी वयाच्या रुग्णांमध्ये कावासाकी डिसीजचे अत्यंत वेदनादायक लक्षणे, अर्थात अधिक ताप, लालबुंद डोळे, शरीरावर खुना आणि ग्रंथींमध्ये सूज, आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.