CoronaVirus Marathi News corona protein treatment drug sng001 trial bigsuccess
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाग्रस्तांसाठी 'हे' औषध ठरतंय संजीवनी; 79 टक्के धोका झाला कमी By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:01 AM1 / 15जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला असून तब्बल सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 15जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 613,213 लोकांचा मृत्यू झाला आहे.3 / 15कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. 14,852,700 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8,906,690 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 4 / 15जगभरातील सर्वच देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनावर औषध अथवा लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून चाचण्या करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना अनेक दिलासादायक घटना समोर आल्या आहेत. 5 / 15कोरोनाच्या लढ्याला यश आलं असून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या या संकटात एक औषध रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाग्रस्तांवर हे औषध प्रभावी ठरत असून त्यांना असलेला धोका हा जवळपास 79 टक्क्यांनी कमी झाला आहे. 6 / 15SNG001 असं या प्रभावी औषधाचं नाव असून ते कोरोना रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. ब्रिटनच्या Synairgen कंपनीने इंटरफेरान बीटा प्रोटीनवर आधारित असलेलं SNG001 औषध कोरोनाग्रस्तांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचा दावा केला आहे. 7 / 15SNG001 मध्ये अँटीव्हायरल प्रोटीन असून ते रुग्णांच्या फुफ्फुसापर्यंत पोहचतं. तसेच ज्या गंभीर कोरोनाग्रस्तांना हे औषध देण्यात आलं. त्यांना असलेला धोका हा 79 टक्क्यांनी कमी झाल्याचा कंपनीचा दावा आहे. 8 / 15रुग्णालयात ज्या कोरोनाग्रस्तांना हे औषध देण्यात आलं ते इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर बरे झाल्याचं देखील कंपनीने म्हटलं आहे. रुग्णांना श्वास घेताना जो त्रास होतो तो देखील कमी झाला आहे. 9 / 15जवळपास 101 रुग्णांवर 30 मार्च ते 27 मे या दरम्यान संशोधन करण्यात आलं असून त्याचे फार चांगले परिणाम समोर आलेत. तसेच औषध प्रभावी ठरत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. 10 / 15Synairgen कंपनीच्या सीईओ रिचर्ड मर्सडेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, SNG001 हे औषधाबाबत करण्यात आलेलं संशोधन हे रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवरील उपचारात यश मिळाल्याचे संकेत असू शकतात. 11 / 15कोरोना व्हायरसवर विविध ठिकाणी संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 15जगातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लस शोधण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली लस सुरक्षित असल्याचे मानवी चाचण्यांमधून समोर आले आहे.13 / 15लस पूर्णपणे यशस्वी ठरल्यास त्याचा मोठा फायदा भारताला होईल. सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या लसीच्या उत्पादनासाठी करार केला आहे. त्यामुळे या लसीचे उत्पादन भारतात होईल. 14 / 15लसीची मानवी चाचणी पुढच्या महिन्यात घेणार असल्याचे सेरमतर्फे सांगण्यात आले. या लसीची सध्या मानवी चाचणी सुरू आहे. शेकडो जणांना ही लस टोचण्यात आली. त्याचे निष्कर्ष दिलासादायक असल्याची माहिती ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेटने दिली. 15 / 15ऑक्सफर्डने तयार केलेल्या लसीला शरीरातल्या रोगप्रतिकार यंत्रणेकडून चांगला प्रतिसाद मिळत असून कोणतेही साईड इफेक्ट्स दिसले नसल्याचं लॅन्सेटने सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications