CoronaVirus Marathi News corona test kit developed ben gurion university israel SSS
CoronaVirus News : लढ्याला यश! जगातली सर्वात जलद, स्वस्त टेस्ट किट तयार, फक्त 1 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार? By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:57 AM1 / 14कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत आहेत. 2 / 14वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने प्रगत देशांची चिंता वाढली आहे. कोरोना टेस्ट किट अनेक चर्चा रंगल्या आहेत.3 / 14चीनने स्वतःच कोरोना टेस्ट किट तयार करून इतर देशांना महागड्या दराने विकल्या. यातील बर्याच किटमध्ये दोष असल्याचे आढळले होते. भारतासह अनेक देशांनी या टेस्ट किट चीनला परत केल्या. 4 / 14कधी अँटीबॉडी टेस्ट किट, तर कधी आरटी-पीसीआर टेस्ट किटबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान आता इस्त्राईलने केवळ 3,800 रुपयांचं कोरोना टेस्ट किट बनवण्याचा दावा केला आहे.5 / 14जगातली ही सर्वात जलद आणि स्वस्त टेस्ट किट असून यामध्ये फक्त एका मिनिटांत कोरोनाचं निदान होते. त्याचे निकाल 90 टक्क्यांपर्यंत अचूक असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.6 / 14इस्त्राईलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे किट तयार केले आहे. इलेक्ट्रो-ऑप्टिकल कोरोना टेस्ट किट नाक, घसा आणि फूंक मारून सॅम्पल घेतले जातात. 7 / 14संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, किटमध्ये एक खास प्रकारचे सेन्सर असून ते कोरोनाचे निदान करते. जेव्हा रुग्ण चाचणी किटमध्ये फुंकतो तेव्हा ड्रॉपलेट्स सेन्सरपर्यंत पोहोचतात. 8 / 14ड्रॉपलेट्स सेन्सरपर्यंत पोहोचल्यानंतर हा सेन्सर क्लाऊड सिस्टमशी कनेक्ट केलेला आहे. सेन्सर सिस्टमचे विश्लेषण केल्यास रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळतं.9 / 14टेस्ट किटची किंमत ही इतर पीसीआर टेस्टपेक्षा कमी आहे. तसेच यासाठी लॅबची देशील आवश्यकता नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. ( सर्व फोटो Credit- Ben-Gurion University)10 / 14विमानतळ, सीमा, स्टेडियम यासारख्या ठिकाणी ही चाचणी किट खूप उपयुक्त ठरेल. या ठिकाणी, त्वरित निकाल देणारी कोरोना टेस्ट किट सर्वात यशस्वी होईल. 11 / 14इलेक्ट्रिक-ऑप्टिकल अभियांत्रिकीमधील बीजीयूच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रिक आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग व विद्याशाखातील संशोधन प्रमुख गॅबी सरुसी यांन ही कल्पना मांडली. 12 / 14किट लोकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) कडून मान्यता मिळवण्यासाठी त्यांची टीम तयारी करत आहे.13 / 14सारूसी यांच्या मते क्लीनिकल ट्रायलच्या सुरुवातीपासूनच याचे चांगले परिणाम मिळत आहेत. कोरोनाच्या वेगवेगळ्या स्टेजबाबतही यातून माहिती मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 14 / 14क्लीनिकल ट्रायलसाठी 120 इस्त्रायली लोकांची निवड करण्यात आली आहे. चाचणीमध्ये याचा उत्तम परिणाम दिसून येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications