शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! फ्रोजन फूडच्या पॅकेटवर आढळला कोरोना व्हायरस, रिसर्चमधून दावा

By सायली शिर्के | Published: October 18, 2020 1:47 PM

1 / 14
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता तब्बल 4 कोटींच्या जवळ पोहोचली असून एकूण रुग्णांची संख्या 39,979,202 वर पोहोचली आहे.
2 / 14
जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1,114,885 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 29,896,747 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. उपचारानंतर त्यांना बरे वाटले आहे.
3 / 14
वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून अनेक ठिकाण त्याचा धोका वाढताना दिसत आहेत.
4 / 14
जगभरातील अनेक देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळत आहे.
5 / 14
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरस संदर्भात महत्त्वाची माहिती मिळत आहे.
6 / 14
फ्रोजन फूडच्या पॅकेजिंगवर (Frozen Food Packaging) म्हणजेच फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या आवरणावर कोरोनाचे व्हायरस आढळून आला आहे.
7 / 14
चीनमधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने निरीक्षण नोंदवलं आहे. फ्रोजन फूडच्या पॅकेटवर कोरोना व्हायरस असल्याचा दावा केला आहे.
8 / 14
मिळालेल्या माहितीनुसार, शेडोंग प्रांतात असलेल्या किंगदाओ शहरात हे आढळून आलं आहे. अशाप्रकारे कोरोना व्हायरस आढळून आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
9 / 14
फ्रोजन फूडच्या पॅकेटच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचं चीनच्या CDC ने म्हटलं आहे. किंगदाओ शहरात या महिन्यात अनेक कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
10 / 14
चीनेने दुसऱ्या देशातून आयात करण्यात येत असलेल्या फ्रोजन फूड पॅकेटमुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन विभागाचे अधिकारी सतर्क आहेत.
11 / 14
चीनमध्ये येणाऱ्या फूड पॅकेजिंगचं नियमित टेस्टिंग केलं जातं. आयात केलेल्या पदार्थांमुळे याआधीही कोरोना व्हायरस पसरल्याचा दावा चीनच्या काही अधिकाऱ्यांनी केला आहे.
12 / 14
फ्रोजन फूड पॅकेजिंगवर कोरोना व्हायरस आढळून आल्यानंतर इंडोनेशियातील सीफूड आणि ब्राझीलमधून आयत करणाऱ्या फ्रोजन फूडसह अन्य काही पदार्थांवर चीनने बंदी घातली होती.
13 / 14
रेफ्रिजेरेटेड फूड पॅकेजिंग (Refrigerated food packaging) प्रोसेसमध्ये काम करणाऱ्या लोकांना यामुळे अधिक दक्षता घेण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी उपाय करण्यात येत आहेत. अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून कोरोनावर मात केली आहे. तसेच जगभरात कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनfoodअन्न