शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : संशोधकांचा दावा; आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 4:57 PM

1 / 12
अमेरिकेतील मिनेसोटा युनिव्हर्सिटीत सेंटर फॉर इंफेक्शियस डिसीज रिसर्च अँड पॉलिसीच्या वतीने 'Covid-19 व्ह्यूपॉइंट' नावाने हे संशोधन करण्यात आले आहे. हे संशोधन इन्फ्लुएंझा महामारीच्या मागील पॅटर्नवर आधारलेले आहे. डॉ. ख्रिश्चन ए. मूर (मेडिकल डायरेक्टर CIDRAP), डॉ. मार्क लिप्सिच (डायरेक्टर, सेंटर फॉर कम्युनिकेबल डिजीज डायनामिक्स, हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ), जॉन एम. बॅरी (प्रोफेसर, तुलाने युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ) आणि मायकल टी. ओस्टरहोम (डायरेक्टर, CIDRAP) यांनी हे संशोधन केले आहे.
2 / 12
जगभरात 1700च्या सुरुवातीनंतर आठ प्रकारच्या इन्फ्लुएंझा महामारी बघितल्या गेल्या आहेत. यापैकी चार तर 1900 नंतर आल्या आहेत. संशोधकांचा अंदाज आहे, की SARS आणि MERSचा विचार करता, SARS-CoV-2ची प्रकृती फार भिन्न आहे.
3 / 12
संशोधनानुसार, सध्या कोरोना व्हायरसचे पॅथोजन्स पाहता, त्याच्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा पूर्वानुमान लावाला जाऊ शकत नाही. इन्फ्लुएंझा व्हायरस आणि Covid-19 व्हायरसमध्ये फरक असला, तरी बरेच साम्यही आहे. हे वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे.
4 / 12
हे दोन्हीही प्रामुख्याने श्वसनाद्वारेच पसरतात. लक्षणे न दिसताही त्यांचा फैलाव होऊ शकतो. एवढेच नाही, तर ते लाखो लोकांना संक्रमित करू शकतात आणि संपूर्ण जगाला कवेत घेऊ शकतात. हे दोघेही नोव्हेल व्हायरल पैथोजन्स आहेत.
5 / 12
Covid-19 आणि इन्फ्लुएंझाच्या अॅपिडेमियोलॉजीमध्ये मुख्य समानता आणि भिन्नता यांची ओळख करून घेऊन Covid-19 महामारीच्या काही शक्यतांचा अनुमान लावला जाऊ शकतो.
6 / 12
मगील साथीच्या रोगांचा विचार करता, संशोधकांनी नोव्हेल कोरोना व्हायरसच्या तीन संभवित परिस्थितींचाही अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर ते या दोहोंमधील मुख्य फरकांकडेही लक्ष आकर्षित करतात. जे Covid-19ला अधिक घातक बनवतात.
7 / 12
नोव्हेल कोरोना व्हायरसचा इंक्यूबेशन पिरियड इन्फ्लुएंझापेक्षा अधिक आहे. कोरोना व्हायरसचे रिप्रोडक्शनही इन्फ्लुएंझा महामारीपेक्षा अधिक आहे. थंडी अथवा गरमीच्या दिवसांत मागील आजारांमध्ये फासरा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.
8 / 12
संशोधकांनी अंदाज वर्तवला आहे, की पहिल्या परिस्थितीत 2020च्या वसंत ऋतूमध्ये Covid-19चे अधिक रुग्ण आढळतील. यानंतर गरमीच्या दिवसांत कोरोनाच्या अनेक छोट्या लाटाही येतील. अशीच परिस्थिती 1-2 वर्ष राहील. मात्र हे सर्व, स्थानीय फॅक्टर्स, भौगोलीक आणि प्रतिबंधक उपाय यांवर अवलंबून असेल.
9 / 12
दुसऱ्या परिस्थितीत 2020च्या पाणगळ अथवा थंडीच्या दिवसांत कोरोनाची दुसरी आणि मोठी लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पुढील वर्षांतही एक अथवा त्याहून अधिकि छोट्या मोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणगळीच्या दिवसांत कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी चांगल्या उपायांची आवश्यकता आहे. हे 1918-19, 1957-58 आणि 2009-10 महामारी प्रमाणेच आहे.
10 / 12
तिसऱ्या परिस्थितीत 2020च्या वसंत ऋतूत, Covid-19च्या पहिल्या लाटेनंतर सुरू असलेले संक्रमण आणि केसेस समोर येणे हळू हळू संपेल. मागील, इन्फ्लूएंझा महामारींमध्ये हा लाटेचा पॅटर्न नव्हता. मात्र, Covid-19चा विचार करता ही शक्यता नाकारता येत नाही, असेही संशोधनात म्हणण्यात आले आहे.
11 / 12
यासंदर्भात संशोधकांनी म्हटले आहे, की अधिकाऱ्यांनी उल्लेख केलेल्या दुसऱ्या परिस्थितीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने तयार राहावे. कारण ही सर्वात खराब स्थिती असेल. तसेच सध्या कुठल्याही प्रकारची व्हॅक्सीन अथवा हार्ड इम्युनिटी उपलब्ध नाही, असेच गृहित धरावे.
12 / 12
या संशोधनात, असेही सांगण्यात आले आहे, की कोरोना लवकर संपणार नाही, हे गृहित धरूनच सरकारांनी तयार राहावे. तसेच, पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी तोंड वर काढण्याची शक्यता आहे, याचा विचार करून सरकारांना तयारी करावी लागेल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited StatesअमेरिकाResearchसंशोधनdoctorडॉक्टरGovernmentसरकार