शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 9:30 PM

1 / 10
आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांच्या चमूला कोरोना व्हायरससंदर्भात आता आणखी एक आणि महत्वाची माहिती हाती लागली आहे. ग्लोबल स्टडीमध्ये आढळून आले आहे, की कोरोना व्हायरसच्या नव्या रुपायत अधिक वेगाने लोकांना संक्रमित करण्याची क्षमता आहे आणि सध्या कोरोनाच्या याच रुपाने अधिकांश लोक संक्रमित होत आहेत.
2 / 10
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, या संशोधकांचे म्हणणे आहे, की कोरोना व्हायरसचे हे नवे रूप युरोपातून अमेरिकेत पोहोचले. नव्या म्यूटेशनमध्ये संक्रमणाचा प्रसार करण्याची अधिक क्षमता आहे.
3 / 10
कोरोना व्हायरसचे हे रूप संक्रमाणाचा फैलाव अधिक वेगाने करत असले तरी, पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांसाठी ते आधिच्या म्यूटेशनच्या तुलनेत कमी त्रास दायक आहे (गंभीर आजारी पाडत नाही).
4 / 10
आता संशोधक, कोरोना व्हायरसच्या या रुपाला व्हॅक्सीनद्वारे लगाम घातला जाऊ शकतो का, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
5 / 10
सध्या ज्या व्हॅक्सीनवर काम सुरू आहे, त्या कोरोना व्हायरसच्या पूर्वीच्या व्हर्जनवरून तयार करण्यात आल्या आहेत.
6 / 10
संशोधकांनी आता या नव्या म्यूटेशनला G614, असे नाव दिले आहे.
7 / 10
Cell नावाच्या एका जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. अभ्यासादरम्यान आढळून आले, की संक्रमित होत असलेले नवे लोक, व्हायरसच्या या नव्या म्यूटेशनमुळेच अधिक प्रमाणावर संक्रमित होत आहेत.
8 / 10
इंग्लंडमधील ड्यूक युनिव्हर्सिटीतील डेव्हिड मॉन्टेफिओरे यांनी सांगितले, की कोरोना व्हायरसचे नवे म्यूटेशन G614 हे जुन्या D614 म्यूटेशनच्या तुलनेत 3 ते 9 पट अधिक संक्रामक असल्याचे आम्हाला संशोधनातून आढळून आले.
9 / 10
लॉस अॅलमॉस नॅशनल लॅबचे बायोलॉजिस्ट बेट्टे कॉर्बर म्हणाले, जागतीक आकडेवारी दर्शवते, की G614 नावाचा कोरोना व्हायरस जुन्या D614 पेक्षा अधिक वेगाने पसरत आहे.
10 / 10
या वैज्ञानिकांनी असेही सांगितले, की 1 मार्चच्या आधी G614 चे रुग्ण युरोप बाहेर आढळून येत नव्हते. मात्र, आता हे सर्व जगभरात पसरले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmericaअमेरिकाdoctorडॉक्टरIndiaभारत