CoronaVirus Marathi News coronavirus patients can not infect others after 11 days says report sna
जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:57 AM1 / 16कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णापासून 11 दिवसांनंतर कोरोना पसरवत नाही. मग भलेही ते 12व्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह का असेना. nypost.comच्या रिपोर्टनुसार, सिंगापूर नॅशनल सेन्टर फॉर इंफेक्शस डिसिजेस (NCID) अँड अॅकॅडमी ऑफ मेडिसीनच्या एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.2 / 16अतापर्यंत असे समजले जात होते, की कोरोना रूग्ण जोवर पॉझिटिव्ह आहेत, तोवर कोरोना पसरवू शकतात. या संशोधनातून असेही समोर आले आहे, की लक्षणे दिसण्याच्या 2 दिवस आधीपासूनच कोरोना रुग्ण संसर्ग पसरवू शकातात.3 / 16वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर 7 ते 10 दिवसांपर्यंत संक्रमण पसरण्याची क्षमता असते, असे या संशोधनात दिसून आले.4 / 16सिंगापूर नॅश्नल सेन्टर फॉर इंफेक्शस डिसीजेसने जवळपास 73 कोरोना रुग्णांवर अभ्यास केला. यादरम्यान त्यांना ही नवीन गोष्ट लक्षात आली. वैज्ञानिक म्हणाले, या संशोधनात असेही दिसून आले, की 11 दिवसांनंतर कोरोना व्हायरसला आयसोलेट अथवा Cultured केले जाऊ शकत नाही.5 / 16वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की लक्षणे दिसण्याच्या एक आठवड्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये अॅक्टिव्ह व्हायरल रिप्लिकेशन कमी होऊ लागते. या नव्या माहितीच्या आधारे, रुग्णांना केव्हा डिस्चार्ज द्यायचा, याचा निर्णय रुग्णालयांना घेता येईल.6 / 16अमेरिकेसह जगातील अनेक देशांत दोन वेळा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच, कोरोना रुग्ण बरा झाला, असे मानले जाते. मात्र, सिंगापूरमध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासाचे सॅम्पल साईज छोटे असले तरी, ही नवी माहिती डॉक्टरांसाठी अत्यंत महत्वाची आहे.7 / 16सिंगापूर NCIDच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर लिओ यी सिनने स्ट्रेट टाइम्सशी बोलताना सांगितले, की सॅम्पल साइज छोटी असली तरी, या नव्या माहितीसंदर्भात संशोधकांना पूर्ण विश्वास आहे. संशोधकांचे म्हणणे आहे, की सॅम्पल साईज अधिक असली तरी हेच परिणाम बघायला मिळतील.8 / 16लिओ यी सिन म्हणाल्या, मला खात्री आहे, की कोरोना रुग्ण 11 दिवसांनंतर संक्रामन पसरवत नाहीत. याचे अनेक पुरावेही आहेत.9 / 16जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता जगातील कोरोनाबाधितांचा आकडा 54 लाखच्याही पुढे गेला आहे.10 / 16जगभरात कोरोनामुळे 3 लाख 45 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.11 / 16जगात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असली तरी, असेही काही देश आहेत. जेथे लॉकडाउनमध्ये शिथीलता देण्यात येत आहे. तर अनेक देशा व्हॅक्सीनच्या शोधार्थ कंबर कसून काम करत आहेत.12 / 16इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार करण्यात येत असलेल्या कोरोना व्हॅक्सीनकडे जगातील अनेक लोक डोळेलावून बसले आहेत. WHOच्या साथीने या विद्यापीठात ChAdOx1 नावाच्या व्हॅक्सीनवर काम सुरू आहे.13 / 16मात्र, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्याच एका वैज्ञानिकांने ChAdOx1 व्हॅक्सीनचे परीक्षण यशस्वी होण्याची आशा 50 टक्केच आहे, असे म्हणून सर्वांनाच धक्का दिला आहे.14 / 16अॅड्रिअन हिल हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या जेनर इंस्टीट्यूटचे संचालक आहेत. ते म्हणाले, पुढील ट्रायलमध्ये 10 हजार व्हॉलंटिअर्सना सहभागी करण्यात येत आहे. मात्र, असेही होऊ शकते, की याचा काहीच निकाल येणार नाही. कारण इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने घट होत आहे.15 / 16गेल्या आठवड्यात अमेरिकन कंपनी मॉडर्नाने आपल्या कोरोना व्हॅक्सीनच्या पहिल्या ट्रायलची माहिती दिली होती. पहिल्या फेरीत केवळ आठ जणांनाच कोरोना व्हॅक्सीन देण्यात आली होती. मात्र, कंपनीने म्हटले होते, की ही वॅक्सीन सुरक्षित असल्याचे दिसत आहे. तसेच ती इम्यून रिस्पॉन्स वाढवते.16 / 16चीनमध्ये तयार झालेल्या एका कोरोना व्हॅक्सीनचा जवळपास 108 जणांवर प्रयोग करण्यात आला. मेडिकल जर्नल The Lancetमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, ही व्हॅक्सीन व्हायरस विरोधातील इम्यून रिस्पॉन्स तयार करते आणि उपयुक्त सिद्ध होऊ शकते, असे या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications