CoronaVirus Marathi News cough syrup medicine ingredient chemical increases rise corona SSS
CoronaVirus News : खोकल्याचं औषध घेत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो कोरोनाचा धोका? By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 3:42 PM1 / 14जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 36 लाखांच्यावर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. 2 / 14कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही वेगाने वाढत असून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. 3 / 14कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 46 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे.4 / 14देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 46 हजार 433 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 5 / 14कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. विविध औषधांची चाचणी करण्यात येत आहे.6 / 14कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असतानाच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खोकल्याचं औषध म्हणजेच कफ सीरपमध्ये एक रसायन आढळून आलं आहे. ज्यामुळे कोरोनाचा धोका हा अधिक वाढू शकतो.7 / 14खोकला असलेल्या कोरोनाग्रस्तांवर एक खास प्रकारच्या खोकल्याच्या औषधाचा उलट परिणाम होत आहे. त्यांच्यामध्ये व्हायरस वेगाने वाढत आहे.8 / 14खोकल्याचं हे औषध शरीरात कोरोनाचा प्रसार करत आहे. सायन्स मॅगझीन नेचरमध्ये 30 एप्रिल रोजी यासंबंधित एक रिसर्च रिपोर्ट प्रकाशित झाला आहे.9 / 14वैज्ञानिकांनी जेव्हा अशा पद्धतीचं खोकल्याचं औषध घेत असलेल्या लोकांची चाचणी केली तेव्हा ही माहिती समोर आली आहे. 10 / 14कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या सॅन फ्रान्सिस्को स्कूल ऑफ फार्मेसीचे रिसर्चर ब्रायन सोईसेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकल्याचं औषध म्हणजेच कफ सीरपमध्ये डेक्स्ट्रोमिथोर्फन (Dextromethorphan) हे रसायन आहे.11 / 14डेक्स्ट्रोमिथोर्फन हे रसायन कोरोना रुग्णांच्या समस्या अधिक वाढवत आहे. या रसायनाच्या मदतीने हा व्हायरस रुग्णाच्या शरीरात वेगाने पसरत आहे. 12 / 14सर्व लोकांनी डेक्स्ट्रोमिथोर्फन हे रसायन असलेलं कफ सीरप बंद केलं पाहिजे असं नाही पण ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांनी मात्र या औषधापासून लांब राहणंच योग्य असल्याचं ब्रायन यांनी म्हटलं आहे.13 / 14ब्रायन आणि त्यांची टीम आंतरराष्ट्रीय स्तरावर गठीत करण्यात आलेल्या वैज्ञानिकांच्या टीमचा एक हिस्सा आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.14 / 14कोरोना व्हायरसचे प्रोटीन आणि व्यक्तीमध्ये सापडत असलेले प्रोटीन तसेच मंकी सेल्स यांच्यातील संबंध ही टीम जाणून घेत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications