CoronaVirus Marathi News covid 19 antibodies rapidly declining in human body
भय इथले संपत नाही! कोरोनाची पुन्हा लागण होण्याचा धोका, अँटीबॉडीबाबत संशोधकांचा दावा By सायली शिर्के | Published: October 28, 2020 1:02 PM1 / 17कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. 2 / 17कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती समोर आली आहे. 3 / 17कोरोना व्हायरसवर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या शरीरातील अँटीबॉडीज लवकर कमी होत असल्यामुळे या रुग्णांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका आहे..4 / 17 ब्रिटीश संशोधकाने हा दावा केला आहे. अँटीबॉडीज लवकरच कमी होत असल्यामुळे दीर्घकाळापर्यंत रोगप्रतिकार क्षमता असण्याची आशाही संपुष्टात येत आहे. कोरोनाच्या आजारावर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा लागण होत नाही असं म्हटलं जात होतं.5 / 17लंडनमधील इम्पिरिअल कॉलेजच्या एका संशोधनात पुन्हा रुग्णांना कोरोनाची लागण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संशोधनात इंग्लंडमध्ये 3,65,000 हून अधिक जणांची तपासणी करण्यात आली. 6 / 17कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करणाऱ्या अँटीबॉडी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती काही महिनेच असू शकते.7 / 17प्रोफेसर वँडी बार्कले यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात लोकांना संक्रमित करणाऱ्या कोरोना व्हायरसची 6 ते 12 महिन्यांत पुन्हा लागण होऊ शकते.8 / 17इम्पिरिअल कॉलेजचे संचालक पॉल इलियॉट यांनी शरीरात अँटीबॉडी असलेल्या व्यक्तींची संख्या कमी होत असल्याचे आम्हाला आढळून आले. तरुणांपेक्षा वृद्धांच्या शरीरात अँटीबॉडी कमी होत असल्याचं दिसून आलंय असं म्हटलं आहे. 9 / 17एका संशोधनात शास्त्रज्ञांनी ब्लड प्लाझ्माच्या प्रभावी काळमर्यादेचा शोध लावण्यास यश मिळवले आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. 10 / 17कॅनडातील क्युबेकमध्ये एका रक्तदान केंद्रातील हेमा-क्युबेकच्या संशोधन पथकाने कोरोनाच्या आजाराला मात दिलेल्या व्यक्तींच्या शरीरातील ब्लड प्लाझ्मा हा तीन महिनेच प्रभावी असतो असा दावा केला आहे. 11 / 17जर त्यानंतर ब्लड प्लाझ्मा दिल्यास त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. शास्त्रज्ञांनी कोरोनाला मात दिलेल्या एका रुग्णाच्या शरीरातून प्लाझ्मा काढला होता. 12 / 17तीन महिन्यातच रक्तातील अँटीबॉडी नष्ट झाले असल्याचे त्यांना आढळून आले. काही दिवसांपूर्वीचे हे संशोधन समोर आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 17भारतात काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू केले आहेत. प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होत असल्याची माहिती समोर आली होती.14 / 17कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला . तसेच यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर कमी झाला असल्याचं देखील म्हटलं होतं. मात्र आता प्लाझ्मा थेरपीबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे.15 / 17प्लाझ्मा थेरपीबाबत आता पुन्हा एकदा चांगले संकेत मिळत आहेत. देशातील काही कोरोना रुग्णांना त्याचा फायदा झाल्याची माहिती संशोधनातून मिळत आहे.16 / 17SARS-CoV-2 RNA ची लागण झालेल्या रुग्णाला धाप लागणं, डोकेदुखी यासारखी लक्षणं दिसत असतील तर त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत प्लाझ्मा थेरपी दिल्यास ही लक्षणं कमी होऊ शकतात.17 / 17कोरोनावर मात केलेल्या अनेक रुग्णांनी प्लाझ्मा दान केले आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील 800 मिली रक्त घेतलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications