CoronaVirus Marathi News dogs and cats can also have covid 19 know this big thing
CoronaVirus News : पाळीव प्राण्यांपासून कोरोनाची लागण?, जाणून घ्या कितपत असतो धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा By सायली शिर्के | Published: October 08, 2020 8:49 AM1 / 14जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे. 2 / 14जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 36,391,057 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे तब्बल 1,060,443 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 / 14कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 4 / 14काही देशांमध्ये प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी दोन पाळीव मांजरांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली होती.5 / 14प्राण्यांना कोरोनाची लागण होते का?, पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होतो का?, माणसाला याचा कितपत धोका असतो? यासह असंख्य प्रश्न लोकांना पडले आहे. आता रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.6 / 14सोशल मीडियावर कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पाळीव प्राण्यांपासून बाधा होत असल्याचे मेसेज व्हायरल होत होते. काही अफवा पसरल्या होत्या. यानंतर आता श्वान आणि मांजरांना देखील कोरोनाची लागण होत असल्याची माहिती मिळत आहे. 7 / 14मांजरांमध्ये कोरोना व्हायरसला जबरदस्त विरोध करणारी प्रतिकारशक्ती विकसित झालेली आहे. त्यामुळे कोरोनावर लस शोधण्याऱ्या व्यक्तींना मांजरींचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे.8 / 14पाळीव प्राण्यांपासून माणसांना कोरोनाची लागण होतो याचा कोणताही पुरावा समोर आला नाही असं देखील रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र एका मांजरीमुळे दुसऱ्या मांजरीला मात्र संसर्ग होऊ शकतो असं समोर आलं आहे.9 / 14कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीचं व्हेटर्नरी मेडिसीन आणि बायोमेडिकल सायन्सेस कॉलेजमधील संशोधकांसोबत अँजेला एम. बॉस्को-लूथ, एरिन ई. हार्टविग आणि स्टेफनी एम. पोर्टर यांनी हा रिसर्च केला आहे. 10 / 14बोस्को लॉथ यांनी दिलेल्य माहितीनुसार, मांजरींना नेहमी संसर्ग होत असतोच पण तो माणसाच्या लक्षात येत नाही. जर प्रयोगशाळेत प्रयोगासाठी संसर्गित केलेल्या मांजरींमध्येही लक्षणं दिसत नाहीत.’11 / 14श्वान, मांजर या पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग माणसांना होण्याचा धोका नाही असं रिसर्चमधून समोर आलं आहे. मात्र काळजी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. 12 / 14पाळीव प्राण्यांपासून कोरोनाची लागण होण्याचा धोका अतिशय कमी असल्याचं याआधी काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 14जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी काही प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, पाळीव प्राण्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं होतं.14 / 14प्राण्यांमुळे माणसांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications