शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! जगभरात दर 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 4:45 PM

1 / 14
कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.
2 / 14
वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 705,023 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
3 / 14
कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला असून तब्बल 18,731,900 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 11,944,244 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
4 / 14
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
5 / 14
अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. याच दरम्यान एक चिंताजनक माहिती आता समोर आली आहे.
6 / 14
जगभरात दर 15 सेकंदाला कोरोनामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाचा वेग वाढला असून धडकी भरवणारी आकडेवारी मिळत आहे.
7 / 14
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा बुधवारी सात लाखांच्या वर गेला. याच दरम्यान दर 15 सेकंदाला एकाचा मृत्यू होत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबत विश्लेषण केले आहे.
8 / 14
अमेरिका, ब्राझील, भारत आणि मॅक्सिको या देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरात दर 24 तासांत तब्बल 5900 लोकांचा मृत्यू होत आहे.
9 / 14
एका तासात तब्बल 247 लोक म्हणजेच दर 15 सेकंदाला एका व्यक्तीला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेत ही संख्या सर्वाधिक आहे.
10 / 14
कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
11 / 14
ऑस्ट्रेलिया, जपान, हाँगकाँग, बोलिव्हिया, इथियोपिया, बुल्गारिया, बेल्जियम यासारखे देश कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले होते. मात्र आता पुन्हा या देशांत रुग्णांची संख्या वाढत आहे.
12 / 14
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. संशोधन सुरू आहे. खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
13 / 14
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 19,08,255 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 39,795 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
14 / 14
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 52,509 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 857 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाBrazilब्राझीलIndiaभारतDeathमृत्यू