CoronaVirus Marathi News health covid19 can spread human pet animal
CoronaVirus News : पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 3:34 PM1 / 12जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे.2 / 12वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात संशोधन सुरू असून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. 3 / 12जगभरात प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दोन पाळीव मांजरांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली होती. 4 / 12प्राण्यांना कोरोनाची लागण होते का?, पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होतो का? यासह असंख्य प्रश्न लोकांना पडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत महत्त्वाची मााहिती दिली आहे. 5 / 12सोशल मीडियावर कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पाळीव प्राण्यांपासून बाधा होत असल्याचे मेसेज व्हायरल होत होते. काही अफवा पसरल्या होत्या. यानंतर आता WHO ने माहिती दिली आहे. 6 / 12पाळीव प्राण्यांपासून कोरोनाची लागण होण्याचा धोका अतिशय कमी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.7 / 12जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी काही प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, पाळीव प्राण्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं आहे.8 / 12प्राण्यांमुळे माणसांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले होते. 9 / 12पाळीव प्राण्यांबाबत असलेल्या अफवेबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 12नागरिक बाहेर जाताना आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही सोबत घेऊन जातात. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई केली होती. 11 / 12जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 308,645 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 12 / 12जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 11,580,119 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 6,547,935 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications