शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ऑक्सफर्डला मिळालं आणखी एक मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 2:45 PM

1 / 15
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देश करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे.
2 / 15
जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14,194,140 वर गेली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 599,416 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
3 / 15
कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असताना अनेक दिलासादायक घटना देखील समोर येत आहेत. जगभरात 8,470,275 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
4 / 15
कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे वाढत आहे. अनेकांना कोरोनाची लढाई जिंकली आहे. जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे.
5 / 15
कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. ते शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. खबरदारीचे उपाय केले जात आहे.
6 / 15
क्वारंटाईन, लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या संकटात आशेचा किरण दिसत आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला आणखी एक यश मिळालं आहे.
7 / 15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ब्रिटनच्या प्रमुख फर्मसोबत मिळून 'गेम चेंजिंग' अँटीबॉडी टेस्ट किट तयार केलं आहे. या किटचं ट्रायल घेण्यात आलं असून ते यशस्वी झालं आहे.
8 / 15
ऑक्सफर्डच्या या किटमुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी लॅबमध्ये जाण्याची आवश्यकता देखील नाही.
9 / 15
टेलिग्राफच्या एका रिपोर्टनुसार, ऑक्सफर्डच्या या अँटीबॉडी टेस्ट (AbC-19 lateral flow test) किटला मोठं यश मिळालं आहे. या नव्या टेस्ट किटमुळे लोक घराच्या घरी चाचणी करू शकणार आहेत.
10 / 15
अँटीबॉडी टेस्ट किट हे 98.6 टक्के अचूक रिझल्ट देत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच जवळपास 300 हून अधिक लोकांवर या किटची चाचणी करण्यात आली आहे.
11 / 15
घरबसल्या टेस्ट किटच्या मदतीने लोकांना फक्त 20 मिनिटांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. या नव्या किटमुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत.
12 / 15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर सर जॉन बेल यांनी रॅपिड टेस्ट खूप जबरदस्त असून येत्या काही दिवसांत याला अधिकृतरित्या मंजुरी मिळू शकते असं म्हटलं आहे.
13 / 15
टेस्ट किट चाचणीमध्ये यशस्वी झाल्याने लाखो किट फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या असल्याचं देखील बेल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 / 15
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि दक्षिण अफ्रिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वात जास्त आहे.
15 / 15
कोरोनामुळे अनेक देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाने परिस्थिती भीषण होत असल्याचं म्हणत चिंता व्यक्त केली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या