शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 4:06 PM

1 / 14
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 63 लाखांवर पोहोचली आहे.
2 / 14
वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 377,889 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,389,493 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
3 / 14
2,924,078 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
4 / 14
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाख 90 हजारांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
5 / 14
कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. अनेक देशांमध्ये संशोधन केलं जात आहे.
6 / 14
कोरोना व्हायरसविरोधातील लसींची चाचणी सुरू आहे. काही लसींची मानवी चाचणी सुरू झालेली आहे. यामध्ये आता लहान मुलांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.
7 / 14
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमार्फत तयार करण्यात आलेल्या लसीची आता लहान मुलांवरही चाचणी केली जाणार आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
8 / 14
5 ते 12 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करण्यात येणार आहे. मुलांवरील उपचारासाठी याची गरज पडू शकते त्यामुळे शास्त्रज्ञांनी हा निर्णय घेतला आहे.
9 / 14
लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनच्या वॅक्सिन सेंटरचे संचालक आणि पिडियाट्रिक इन्फेक्शन आणि इम्युनिटीचे प्राध्यापक बिएट कॅम्पमॅन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
10 / 14
'हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र सर्वांनी स्वत:ला विचारायला हवं. आपल्या मुलाला पुढे जाऊन लसीची गरज पडेल' असं बिएट कॅम्पमॅन यांनी सांगितलं.
11 / 14
'इतर सर्व लोक सुरक्षित लस विकसित करण्यासाठी मदत करत आहेत. ज्या लोकांनी हे छोटंस पाऊल उचललं आहे, त्यांचे आपण आभार मानायला हवेत' असं देखील कॅम्पमॅन यांनी म्हटलं आहे.
12 / 14
ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीच्या प्रयोगाच्या पुढील टप्प्यात लहान मुलांवरही या लसीचा प्रयोग केला जाणार आहे.
13 / 14
जूनमध्येच या लसीचं व्यापक स्तरावर ट्रायल होणार आहे. 10260 लोकांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे.
14 / 14
वयस्कर व्यक्तींवर याआधी या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरIndiaभारतDeathमृत्यू