शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 1:44 PM

1 / 9
कोरोनाला रोखण्यासाठी जगातील सर्वच देश नवनव्या उपाय योजना आणि नियम तयार करत आहेत. असेच काही नियम कतार, या मुस्लीम देशानेही तयार केले आहेत. एवढेच नाही, तर हे नियम तोडणाऱ्याला तेथे भयान शिक्षाही देण्यात येणार आहे.
2 / 9
कतारने आपल्या देशात, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांसाठी कतारने रविवारी एक कठोर शिक्षा लागू केली. एएफपीच्या वृत्तानुसार, कतारमध्ये आता मास्क वापरले नाही, तर जगातील सर्वात कडक शिक्षा दिली जाणार आहे. (फोटोमध्ये कतारचे राजे तमीम बिन हम्माद अल थानी)
3 / 9
येथे, मास्क न वापरणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत कारावास होऊ शकते. एवढेच नाही, तर दंड म्हणून मोठी रक्कमही द्यावी लागू शकते.
4 / 9
कतारमध्ये कोरोना व्हायरस फार वेगाने पसरत आहे. जगाचा विचार करता, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा सर्वाधिक दर कतारमध्ये आहे. यामुळे येथील प्रशासनाने नियम तोडणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची घोषणा केली आहे.
5 / 9
कतारची लोकसंख्या 27 लाख एवढी आहे. असे असताना येथील 30 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर येथील 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
6 / 9
आता येथे, मास्क परिधान करण्यासंदर्भातील नियम तोडणाऱ्यांना 41.7 लाख रुपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो. मात्र, गाडीने एकटे प्रवास करणाऱ्यांसाठी, मास्क परिधान करण्यासंदर्भातील नियमात सूट देण्यात आली आहे.
7 / 9
एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, नवे नियम लागू होण्यापूर्वी, पोलीस यासंदर्भात लोकांना माहिती देत आहेत. आतापर्यंत जगातील जवळपास 50 टक्के देशांनी मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे.
8 / 9
आफ्रिकन देश Chad येथे मास्क परिधान केले नाही, तर 15 दिवसांचा कारावास होऊ शकतो. तर मोरक्कोमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान केले नाही, तर तीन महिन्यांच्या कारावासाटी शिक्षा निश्चित करण्यात आली आहे.
9 / 9
कतारच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की देशातील संक्रमाणाचा दर वाढण्यामागे, रमजानच्या महिन्यात लोक एकत्रित येत आहेत, हेही कारण असू शकते. सोबत भोजन घेण्यासाठी लोक रमजानच्या महिन्यात एकत्रित येत असतात.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याQatarकतारLokmatलोकमतMuslimमुस्लीमIslamइस्लामjailतुरुंगPoliceपोलिस