CoronaVirus Marathi News serum institute of india corona vaccine oxford astrazeneca who covax
कोरोनाच्या लढ्याला यश! सीरमची लस सुरक्षित, आता जगभरात दिली जाणार; WHOने दिली वापरास परवानगी By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 8:39 AM1 / 17जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. काही देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 2 / 17जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले असून युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे, याच दरम्यान कोरोना लसीबाबबत एक मोठी दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. 3 / 17सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) तयार केलेल्या ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीच्या (Corona Vaccine) आपात्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) परवानगी दिली आहे. 4 / 17जगभरात आता सीरमच्या लसीचा वापर हा केला जाणार आहे. आता ही कोरोना लस जगातील गरीब देशांमध्ये कोरोनाविरूद्ध लढ्यासाठी वापरली जाईल. जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरास मान्यता दिली आहे. 5 / 17या दोन्ही लसी ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाने तयार केल्या आहेत. एक लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट तर दुसरी दक्षिण कोरियाची एसके बायो कंपनी तयार करत आहे. या लसी सुरक्षित असल्याचं देखील म्हटलं आहे.6 / 17जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानॉम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ग्रीन सिग्नलमुळे लसीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत जगभरातील अनेक देशांना लस देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जगभरातील निर्धन देशांना जागतिक आरोग्य संघटनेमार्फत कोरोनाची लस पाठवली जात आहे.7 / 17सोमवारी ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या दोन लसींच्या आपात्कालीन वापरास परवानगी दिली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार, जिथे अजूनही कोरोनाची लस पोहोचलेली नाही आणि जिथे अजूनही मोठ्या प्रमाणात लोक कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत, अशा ठिकाणी लसीकरणाला सुरुवात केली जाईल.8 / 17जागतिक आरोग्य संघटना लसीच्या वापराला परवानगी देण्याआधी त्याच्या सुरक्षिततेचा, गुणवत्तेचा अभ्यास करते. त्यामुळे, संघटनेनं दिलेल्या परवानगीनंतर आता याच्या वापराबद्दल मनात संभ्रम असलेले देशही लवकरच लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करतील. 9 / 17जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं, की भारत आणि दक्षिण कोरियातील दोन कंपनी एकाच लसीचं उत्पादन करत असलं तरी दोन्ही प्लान्ट वेगळे असल्याने त्यांची वेगवेगळी चाचणी करून परवानगी देण्यात आली आहे. 10 / 17WHOच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीला परवानगी देण्याची प्रक्रिया निर्मात्यांकडून संपूर्ण संशोधन कागदपत्रं मिळाल्यानंतर केवळ 4 आठवड्यात पूर्ण करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 17ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका कंपनी यांनी संयुक्तरीत्या तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरच कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचं प्रमाण 67 टक्क्यांनी कमी झालं आहे.12 / 17कोरोनाच्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी ही लस परिणामकारक ठरत आहे, असं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे. कोरोनाच्या संकटात लस परिणामकारक ठरत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.13 / 17पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( serum institute of india) आणि युनिसेफ (UNICEF) यांच्यात कोविशील्ड व नोवाव्हॅक्सच्या पुरवठ्यासाठी मोठा करार झाला आहे. या करारानुसार सीरमकडून येत्या काळात जगातील 100 देशांना 110 कोटी कोरोना लशीचे डोस पुरवले जाणार आहेत. 14 / 17या माध्यमातून भारत देश कोरोना लसीच्या निर्मितीतील एक महत्वाचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. याशिवाय अनेक देशांनी कोरोना लस खरेदी करण्यासाठी भारताशी संपर्क देखील साधला आहे. 15 / 17ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाच्या संयुक्त विद्यमातून विकसित करण्यात आलेल्या कोविशील्ड लसीचे उप्तादन करण्याचा कारार सीरम इन्स्टिट्यूटशी झालेला आहे. तर नोव्हॅक्स या लसीच्या उप्तादनासाठी सीरमचा अमेरिकास्थित नोव्हॅक्स इंक कंपनीशी झालेला आहे. युनिसेफचे कार्यकारी अधिकारी हेनरीटा फोर यांनी सीरमसोबत झालेल्या कराराची माहिती जाहीर केली आहे. 16 / 17जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांमध्ये लस पुरवठा करण्यासाठी सीरमसोबत काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असं युनिसेफनं म्हटलं आहे. अल्प उत्पन्न गटापर्यंत कोरोना लस पोहोचविण्यासाठी याआधीच कोव्हॅक्स मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. याचं नेतृत्व संयुक्त राष्ट्र संघ करत आहे. 17 / 17मोहिमेअंतर्गत जगातील 145 देशांमधील मजूर आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना स्वस्त दरात कोरोना लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी कोरोना लस बनविणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications