CoronaVirus Marathi News study says mosquito not able to transmit corona
CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 11:26 AM1 / 12कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्यावर गेली आहे. अनेक ठिकाणी उद्रेक झाला आहे.2 / 12कोरोनामुळे जगभरातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी काही देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 3 / 12कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 4 / 12कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या मनात कोरोना व्हायरसशी निगडीत अनेक प्रश्न आहेत. मच्छर चावल्याने कोरोणाची लागण होते अशी चर्चा रंगली होती. 5 / 12मच्छरमुळे कोरोनाचा संसर्ग होतो?, एखादा डास कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला चावल्यानंतर इतर व्यक्तींना चावला तर इन्फेक्शन होतं का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. 6 / 12मच्छर चावल्याने खरंच कोरोना होतो का? याबाबत आता नव्या रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या एका विद्यापीठामध्ये याबाबत संशोधन करण्यात आलं आहे. 7 / 12मच्छरमुळे कोरोनाची लागण होत नाही अशी माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याआधी मच्छरबाबत अशीच माहिती दिली होती. 8 / 12रिसर्चनुसार, कोरोनाचा संसर्ग पसरवणारा SARS-CoV-2 व्हायरस मच्छर चावल्याने होत नाही. त्यामुळे मच्छर चावल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही. 9 / 12एडीज एजिप्टी, एडीस अल्बोपिक्टस आणि क्यूलेक्स क्विनकॅफॅसिअसस या मच्छरांच्या तीन प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. मच्छरांच्या या तीनही प्रजाती आहेत. 10 / 12रिसर्चमधून मच्छरबाबत महत्त्वाची माहिती समोर आल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 12देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.12 / 12भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 10,77,618 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 26,816 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications