1 / 11कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार करण्यासाठी जगभरात वैज्ञानिकांच्या एकूण 90 टीम काम करत आहेत. या सर्वच वेगवेगळ्या स्तरावरही पोहोचल्या आहेत. मात्र, या पैकी केवळ सहाच टीम अशा आहेत, ज्या आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचल्या आहेत. ज्यांनी ह्यूमन ट्रायल अर्थात मानवावर व्हॅक्सीनचे परीक्षण करायलाही सुरूवात केली आहे. तर जाणून घेऊयात, या 6 व्हॅक्सीनसंदर्भात. नेमक्या कुठे आणि कोण तयार करत आहे या व्हॅक्सीन. तसेच या कशापद्धतीने काम करतील? 2 / 11सर्वप्रथम जाऊयात, अशा ठिकाणी जेथून कोरोना पसरला. चीनमध्ये सध्या तीन व्हॅक्सीनचे ह्युमन ट्रायल सुरू आहे. 1. AD5-nCoV व्हॅक्सीन - चिनी कंपनी कॅन्सिनो बयोलॉजिक्सने 16 मार्चपासूनच परीक्षणाला सुरुवात केली आहे. कॅन्सिनोसोबत चीनच्या अॅकेडमी ऑफ मिलिट्री मेडिकल सायंसेस आणि इंस्टिट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजीदेखील काम करत आहे. या कंपनीने कोरोनावरील उपचारासाठी व्हायरसला नष्ट करण्यासाठी व्हायरसचाच उपयोग केला आहे...3 / 11...यात मानवी शरीरात डोळे, श्वास नलिका, फुफ्फूस, आतडे आणि नर्व्हस सिस्टममध्ये संसर्गाचे कारण बनलेला व्हायरस एडेनोव्हायरसचा उपयोग केला जात आहे. चीन या एडेनोव्हायरसला शरीरात टाकून पेशींमध्ये, असे प्रोटीन सक्रीय करेल जे कोरोना व्हायरसचा सामना करेल. यामुळे माणसाची रोगप्रतिकार शक्तीही वाढेल. 4 / 112. LV-SMENP-DC व्हॅक्सीन - चीनमधील शेंझेन जीनोइम्यून इंस्टिट्यूटने एक व्हॅक्सीन तयार केली आहे. ही व्हॅक्सीन HIVसाठी जबाबदार असलेल्या व्हायरस लेंटीव्हायरसवर आधारलेली आहे. या कंपनीने अशा पेशींची मदत घेतली आहे, ज्या प्रतिरोधक क्षमतेला सक्रिय करतात. या पेशी बाहरेरून शरीरात वायरस येताच सक्रीय होतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात. यांच्या हल्ल्यामुळे एकतर व्हायरस मारला जातो अथवा निष्क्रिय तरी होतो. 5 / 113. तिसरी व्हॅक्सीन तयार होतेय वुहानमध्ये - चीनच्या वुहानमधील बायोलॉजिकल प्रोडक्ट्स इंस्टीट्यूटमध्ये, एक अशी व्हॅक्सीन तयार करण्यात येत आहे. जी निष्क्रिय कोरोना व्हायरसपासून तयार होत आहे. चीनमधील वैज्ञानिकांनी या निष्क्रिय कोरोना व्हायरसच्या जींसमध्ये, अशा प्रकारे बदल केला आहे, की आता तो कुठल्याही व्यक्तीला संक्रमित करू शकत नाही. ही व्हॅक्सीन तयार करण्याची पारंपरीक पद्धत आहे. जास्तीत जास्त व्हॅक्सीन याच पद्धतीने तयार केल्या जातात. 6 / 11इंग्लंडमध्ये सुरू आहे प्रयोग - 4. ChAdOx1 व्हॅक्सीन - ऑक्सफोर्ड विद्यापीठात ChAdOx1 व्हॅक्सीन विकसित केली जात आहे. युरोपात पहिले क्लिनिकल ट्रायल 23 एप्रिलला सुरू झाले. येथेही व्हायरसनेच व्हायरसला नष्ट करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे वैज्ञानिक चिंपांजीपासून घेतलेल्या कमकुवत एडेनोव्हायरसचा उपयोग करत आहे. तो मानवी शरीरात गेल्यानंतर मानवाला काही त्रास होऊ नये म्हणून, यात काही जेनेटिक बदलही करण्यात आले आहेत. 7 / 11अमेरिकेतही सुरू आहे व्हॅक्सीन तयार करण्याचे काम - 5. mRNA-1273 व्हॅक्सीन - अमेरिकेतील मॅसाच्युसेट्समधील बायोटेक्नॉलॉजी कंपनी मॉडर्ना थेराप्यूटिक्स, एक अशी व्हॅक्सीन तयार करत आहे, जी कोरोनाचा सामना करण्यासाठी मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला प्रशिक्षित करेल. ही व्हॅक्सीन कोरोना व्हायरसला शरीरात परसण्यापासून रोखेल. 8 / 11...यासाठी मॉडर्नाने कमकुवत आणि जवळपास निष्क्रिय व्हायरस मानवाच्या शरीरात टाकण्याची तयारी केली आहे. मात्र, मॉडर्नाने यासाठी कोरोना व्हायरसचा वापर केलेला नाही. यासाठी वैज्ञानिकांनी कोरोनाचा जेनेटिक कोड तयार केला आहे. याचा एक छोटासा भाग सुईच्या सहाय्याने शरीरात टाकला जाईल. यानंतर तो कोरोना व्हायरसचा सामना करेल.9 / 116. INO-4800 व्हॅक्सीन - अमेरिकीतील पेंसिलवेनियामधील फार्मा कंपनी इनोव्हियो, एक अशाप्रकारची व्हॅक्सीन तयार करत आहे, ज्यात रुग्णाच्या पेशींमध्ये प्लाझ्मिडपासून डीएनए शरीरात इंजेक्ट केले जातील. यामुळे रुग्णाच्या शरीरातच कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतील...10 / 11...इनोव्हियो एका जेनेटिक स्ट्रक्चरमध्ये बदल करून हा आजार बरा करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण शरीरात जेनेटिकलीच या आजाराचा सामना करण्याची क्षमता निर्माण झाली, तर भविष्यात अशा प्रकारचा धोका कधही उद्भवणार नाही.11 / 11जगभरातील मोठ-मोठे वैज्ञानिक भलेही व्हॅक्सीनचा शोध लावत असोत. मात्र, या पौकी एखादी व्हॅक्सीन कामात येईल की नाही, याची कुठल्याही प्रकारची खात्री नाही. व्हॅक्सीन तयार करणे हे फार मोठे आव्हान नाही, तर ते मोठ्या प्रमाणावर तयार करून लोकांपर्यंत पोहोचवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.