CoronaVirus : चीनचा पलटवार; "नुकसान भरपाई मागणारे स्वप्न पाहतायत, आम्ही झुकणार नाही" By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 9:06 PM1 / 9कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून संपूर्ण जग चीनवर टीका करत आहे. चीनवर अनेक प्रकारचे आरोपही केले जात आहेत. एवढेच नाही, तर कोरोना महामारीसाठी चीनला जबाबदार धरत, झालेल्या नुकसानाची भरपाईदेखील मागितली जात आहे. मात्र याला चीनने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.2 / 9यासंदर्भात चीनचे परराष्ट्रमंत्री वॉन्ग यी रविवारी म्हणाले, चीनकडे नुकसान भरपाई मागणारे लोक स्वप्न पाहत आहेत. यापूर्वी वॉन्ग म्हणाले होते, की कोरोना व्हायरससंदर्भातील आंतरराष्ट्रीय तपासासाठी चीन तयार आहे. मात्र, हा तपास राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असायला हवा.3 / 9वॉन्ग म्हणाले, 'इतर देशांप्रमाणेच चीनलाही कोरोनाचा फटका बसला आहे आणि जेव्हा गरज पडली, तेव्हा इतर गरजू सरकारांचीही चीनने मदत केली आहे. 4 / 9ते म्हणाले, 'अम्हाला वाईट वाटते की, कोरोना शिवाय, अमेरिकेत, एक राजकीय व्हायरसदेखील पसरला आहे. जो चीनवर हल्ला करण्याची आणि चीनला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही.'5 / 9वांग म्हणाले, तथ्य माहित नसलेल्या काही अमेरिकन नेत्यांनी खोटी माहिती पसरवली आहे आणि अनेक कटही रचले आहेत. अशा प्रकाचे खटले आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कसोटीवर सिद्ध होणार नाहीत. हे विवेकाला धरून नसेल. हे खोटारडे, न्यायसंगत नसलेले आणि बेकायदेशीर आहेत. 6 / 9अप्रत्यक्षपणे अमेरिकेला सावध करताना वांग म्हणाले, चीन विरोधात अशाप्रकारचे वाद जे लोक आणतील, ते दिवसा स्वप्त पाहत आहेत आणि स्वतःलाच अपमानित करतील.'7 / 9जगातील अनेक देश, या महामारीसाठी चीनला जबाबदार धरत आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान उघड पणे चीनवर हल्ला करत आहेत. एवढेच नाही, तर चीन आणि वुहान लॅबची चौकशी व्हावी यासाठी अमेरिका आग्रही आहे.8 / 9कोरोनासंदर्भात अमेरिकेने चीनवर आरोप केल्यानंतर जर्मनी आणि फ्रान्स सारख्या देशांनीही चीनलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.9 / 9अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते, की चीनने कोरोना संदर्भात माहिती लपवून जागतीक अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications