CoronaVirus Marathi News us chapel hills high security lab made coronavirus
CoronaVirus News : अमेरिकेच्याच लॅबमध्ये तयार झाला होता कोरोना; उंदराला केलं होतं संक्रमित, रिपोर्टमधून दावा By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 4:00 PM1 / 14कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे जगभरात अनेक प्रगत देश हतबल झाले आहेत. 2 / 14जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या तब्बल 22,325,623 पोहोचली आहे. तर 784,770 लोकांचा मृत्यू झाला आहे. 3 / 14जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. तसेच खबरदारीचे सर्व उपाय हे केले जात आहेत. 4 / 14कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. सातत्याने यामधून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी काय करता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 5 / 14कोरोना व्हायरस नेमका कसा आणि कुठे तयार झाला याबाबत आणखी एक दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार झाला होता असं म्हटलं जात आहे. 6 / 14पाच वर्षांपूर्वी चीनच्या वुहानमधील एका लॅबमध्ये जेव्हा कोरोना व्हायरस होता. त्याचवेळी अमेरिकेच्या लॅबमध्ये देखील एका उंदरावर कोरोनाची चाचणी सुरू होती. एका रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे. 7 / 14फेब्रुवारी 2016 मध्ये अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामधील यूएनसी चॅपल हिल्स हाय सिक्योरिटी लॅबमध्ये एक घटना घडली. अमेरिकेतील लॅब आणि चीनमधील लॅब पार्टनरशिपमध्ये या प्रोजेक्टवर काम करत असल्याचं म्हटलं जात आहे. 8 / 14अमेरिकाच्या युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनाच्या चॅपल हिल्स हाय सिक्योरिटी बायो लॅब 3 मध्ये तयार करण्यात आलेल्या सार्स कोरोना व्हायरसने उंदराला संक्रमित करण्यात आलं. याच दरम्यान लॅबमध्ये एक विचित्र घटना घडली. ज्याबाबत अमेरिकेने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.9 / 14प्रोपब्लिका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या उंदराला एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्याचवेळी तो लॅबमधील एका महिला टेक्नीशियनच्या हाताला चावला. 10 / 14महिला टेक्नीशियनला क्वारंटाईन करण्याऐवजी तिला तसेच ठेवलं. रोज तिचे तापमान चेक केलं. मात्र 10 दिवस तिच्यावर लक्ष ठेवलं. मात्र तिला कोणताही त्रास न झाल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.11 / 14वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, लॅबच्या रेकॉर्डमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मात्र ते अद्याप सार्वजनिक करण्यात आलेलं नाही. तसेच व्हायरस संदर्भात कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. 12 / 14अमेरिकेतच सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. महासत्ता अशी ओळख असणाऱ्या अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. 13 / 14रटगर्स युनिव्हर्सिटी के मॉलीक्यूलर बायोलॉजिस्ट रिचर्ड ईब्राइट यांनी चॅपल हिल्स लॅबच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. व्हायरसशी निगडीत अनेक घटना घडल्या असल्याचं देखील म्हटलं आहे. 14 / 142007 मध्ये अमेरिकेत व्हायरस आणि बॅक्टेरिया संबंधी इशारा देण्यात आला आहे. एखाद्या व्हायरसचा प्रसार झाला तर लाखो लोकांचं जगणं कठीण होईल असं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications