CoronaVirus Marathi News US Doctor Josheph treating coronavirus 260 days
कर्तव्यनिष्ठेला सलाम! तब्बल 260 दिवसांपासून एकही सुट्टी न घेता "हा" डॉक्टर करतोय रुग्णसेवा By सायली शिर्के | Published: December 14, 2020 10:35 AM1 / 14कोरोनाने जगभरात थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि वैदयकीय क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. 2 / 14आपल्या घरापासून लांब राहून कोरोना वॉरिअर्स रुग्णांची सेवा करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना अमेरिकेत समोर आली आहे. तब्बल 260 दिवसांपासून एकही दिवस सुट्टी न घेता एक डॉक्टर रुग्णसेवा करत आहे.3 / 14डॉ. जोसेफ वरोन (Dr. Joseph Varon) असं या डॉक्टरचं नाव असून ते अमेरिकेतील नॉर्थ ह्यूस्टनमधील युनायटेड मेमोरियल येथे कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांवर उपचार करणाऱ्या एका छोट्याशा रुग्णालय रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर म्हणजेच येथील चीफ ऑफ स्टाफ आहेत. (फोटो क्रेडीट -AFP) 4 / 14काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर थँक्स गिव्हींगच्या निमित्ताने डॉ. जोसेफ वरोन यांना रुग्णालयातील एका वयोवृद्ध रुग्णाला मारलेल्या मिठीचा फोटो तुफान व्हायरल झाला होता. 5 / 14जोसेफ यांचा हा फोटो जोरदार व्हायरल झाल्यानंतर एएफपी या वृत्तसंस्थेने त्यांच्याबद्दलची माहिती गोळा केली आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी रुग्णालयात पोहचले. 6 / 14जेव्हा एएफपीची टीम रुग्णालयात पोहचील तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण डॉ. जोसेफ हे एकही दिवस सुट्टी न घेता त्या दिवशी सलग 260 व्या दिवशी रुग्णसेवा करत होते.7 / 14डॉ. जोसेफ यांनी रुग्णालयामधून आपण घरी गेल्यानंतरही आपला बराचसा वेळ हा फोनवर रुग्णांची बोलण्यात आणि इतर कामासंदर्भातील फोन कॉल्समध्येच जात असल्याचं म्हटलं आहे.8 / 14डॉ. जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना खाण्यापिण्यासाठीही पुरेसा वेळ नसतो. त्यामुळेच जेव्हा कोणी त्यांना काही खाण्याचे पदार्थ देतात तेव्हा ते त्याचा आनंदाने स्वीकार करतात. 9 / 14जेवणासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे कामातून वेळ मिळेल त्यावेळी खाल्ल्याने गेल्या काही दिवसांमध्ये माझं वजन 15 किलोंनी वाढलं आहे, असं डॉ. जोसेफ यांनी हसतहसत सांगितलं आहे.10 / 14कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे डॉ. जोसेफ यांनी जुलै महिन्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, मी आणि माझे कर्मचारी सतत काम करुन खूप थकलो आहोत, असं म्हटलं होतं. 11 / 14रुग्णालयातील नर्सने एवढ्या वेळ काम केलं आहे की त्या पूर्णपणे थकल्या आहेत. त्या एवढ्या थकल्यात की आता त्यांना कोणत्याही क्षणी रडू येईल. 12 / 14कोरोना संसर्गाच्या कालावधीमध्ये स्वस्तात उपचार पुरवणाऱ्या या रुग्णालयामध्ये जेवढे रुग्ण दाखल झालेत सर्वांवर योग्य उपचार करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी न थकता दिवस रात्र काम केलं आहे. 13 / 14काम खूप जास्त प्रमाणात असल्याने कर्मचाऱ्यांनाही थकवा आल्याचं डॉ. जोसेफ यांनी म्हटलं होतं. डॉक्टरांच्या या कर्तव्यनिष्ठेला सर्वांनी सलाम केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.14 / 14जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सात कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications