CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 8:40 AM1 / 16जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 16कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून जगभरात कोरोनावरील लस आणि औषध शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 3 / 16ऑक्सफोर्ड विद्यापीठ कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी तयारीत आहे. अनेक ठिकाणी चाचण्या घेण्यात येत असून त्यांना यश येत असल्याची माहिती मिळत आहे. 4 / 16जगभरात कोरोना वॅक्सीनचीच चर्चा रंगली आहे. वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 5 / 16'2021 आधी कोरोनाचं वॅक्सीन येणं खूप कठीण आहे. वॅक्सीन येण्याची शक्यता अगदी कमी' असल्याचं WHO ने म्हटलं आहे. WHOचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी याबाबत माहिती दिली आहे. 6 / 16कोरोनाचं वॅक्सीन संशोधनाला यश मिळत आहे. मात्र 2021 आधी ही वॅक्सीन उपलब्ध होऊ शकत नाही अशी माहिती माईक रायन यांनी दिली आहे. 7 / 162021 च्या सुरुवातीच्या टप्प्यात हे वॅक्सीन तयार झालं तरीही ते सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात बराच वेळ लागू शकतो असं देखील रायन यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.8 / 16कोरोनावरील लस शोधण्यासाठी जगभरात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान रुग्णांची संख्या देखील सातत्याने वाढत असल्याने व्हायरसचा प्रसार रोखणे हे देखील अत्यंत गरजेचं असल्याचं WHO ने म्हटलं आहे. 9 / 16कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात जगातील सुमारे 150 कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असतानाच अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांनी लस आपल्याला आधी मिळावी, यासाठी घाई सुरू केली आहे. त्यासाठी कोट्यवधींची रक्कमही कंपन्यांना देऊन टाकली आहे.10 / 16प्रख्यात फायझर आणि जर्मनीतील बायोएन टेक या दोन कंपन्यांनीही लस विकसित केली आहे. तिचे 100 दशलक्ष डोस डिसेंबरपर्यंत मिळावेत, यासाठी अमेरिकेने या कंपन्यांना कोट्यवधी डॉलर्स दिले आहेत. 11 / 16अमेरिकेला 2021 च्या अखेरपर्यंत या कंपन्या लस पुरवतील. युरोपीय राष्ट्रांनीही कोट्यवधी युरोद्वारे लस सर्वात आधी मिळवण्यासाठी काही कंपन्यांकडे मागणी नोंदवली आहे.12 / 16जगातील 150 कंपन्या लस तयार करण्याच्या प्रक्रियेत असल्या तरी रशिया आणि चीन या दोन देशांनी ती तयार केल्याचा व तिच्या सुरुवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.13 / 16ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनमधील कंपनीच्या सहकार्याने सिरम ही लस भारतात तयार करणार आहे. त्या लसीच्या काही चाचण्या शिल्लक असल्या तरी आतापर्यंतच्या निष्कर्षांच्या आधारे सिरमने पुण्यात लसीचे उत्पादन सुरू केले असल्याचे वृत्त आहे. 14 / 16लस डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल आणि पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल, असं पूनावाला यांनी मंगळवारीच सांगितले होते.15 / 16सिरमखेरीज भारतातील आणखी 4 ते 5 कंपन्या कोरोना लसीवर काम करीत आहेत. त्यापैकी भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिन या लसीच्या चाचण्या देशातील काही मोठ्या रुग्णालयात सुरू झाल्या आहेत.16 / 16सुमारे 10 हजार जणांवर चाचण्या होतील,अशी अपेक्षा आहे. ही लस 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध व्हावी, असा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications