शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता

By सायली शिर्के | Published: September 26, 2020 3:18 PM

1 / 16
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे.
2 / 16
जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 32,792,505 वर पोहोचला आहे. तर 993,971 लोकांना व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागल आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
3 / 16
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. तसेच जगभरात लस आणि औषध शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी संशोधन सुरू असून चाचण्यांना यश आलं आहे.
4 / 16
कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेकांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असतानाच चिंताजनक माहिती समोर आली आहे.
5 / 16
जगभरात तब्बल 150 हून अधिक लसींवर काम सुरू आहे. मात्र कोरोनाची यशस्वी लस येण्याआधी जगभरात तब्बल 20 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
6 / 16
कोरोनामुळे जगभरात 20 लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. WHO चे इमर्जेंसी प्रोग्राम हेड माइक रायन यांनी ही चिंता व्यक्त केली.
7 / 16
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संघटीत होऊन योग्य ती पावलं वेळवर उचलली गेली नाहीत तर मृतांचा आकडा हा 20 लाखांहून अधिक होऊ शकतो.
8 / 16
कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडणं थोडं कठीण आहे. नवे रुग्ण आढळून येत आहेत. घरामध्ये होणाऱ्या पार्टीमुळे देखील कोरोनाचा प्रसार होत असल्याचं माइक रायन यांनी म्हटलं आहे.
9 / 16
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, माइक रायन यांनी कोरोनाबाबतची ही भीती व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस समोर आल्यानंतर गेल्या नऊ महिन्यांमध्ये 9.93 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
10 / 16
अमेरिकेसारख्या प्रगत देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तसेच तेथे दोन लाखांहून अधिक लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. सातत्याने तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.
11 / 16
कोरोनाचे रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांच्या संख्येने 59 लाखांचा टप्पा पार केला आहे.
12 / 16
देशातील रुग्णांचा आकडा 59,03,933 वर गेला असून कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 93,379 लोकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 85,362 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
13 / 16
कोरोनाची लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोरोना या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरणं, सोशल डिस्टेंसिंग, सॅनिटायझर, आणि फेस शिल्डच्या वापरावर अधिक भर दिला जात आहे.
14 / 16
निरोगी राहण्यासाठी आणि संसर्गाला दूर ठेवण्यासाठी मास्क इतकंच फेस शिल्ड प्रभावी ठरतं असं अनेकांचे मत आहे. मात्र आता फेस शिल्डबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.
15 / 16
जपानी सुपर कम्पुटरनुसार, (Japanese Supercomputer Fugaku) कोरोनापासून वाचण्यासाठी लोक प्लास्टिक शिल्डचा चेहऱ्यावर वापर करत आहेत. पण हे फेस शिल्ड्स ऐरोसोल्साला पकडण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचं दिसून आलं आहे.
16 / 16
प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित ठेऊ शकत नसल्याचा, दावा सुपर कम्पूटरकडून करण्यात आला आहे. पारदर्शी फेस शिल्डच्या वापरानं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाDeathमृत्यूAmericaअमेरिकाIndiaभारत