1 / 15जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 71 लाखांच्या वर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 2 / 15जगभरात कोरोनान थैमान घातले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 71 लाखांच्या वर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 3 / 15कोरोनाची लक्षणं नसलेल्या अनेक व्यक्तीची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना व्हायरसचा प्रसार होतो का? याबाबत WHO ने आता खुलासा केला आहे. 4 / 15एसिंप्टोमेटिक म्हणजेच लक्षणं नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. 5 / 15WHO की एपिडेमियोलॉजिस्ट मारिया वॅनकेरखोवे यांनी अनेक देशांमध्ये कोरोनाचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याची माहिती दिली आहे. 6 / 15निम्म्याहून अधिक एसिंम्प्टोमॅटिक प्रकरणे नवीन प्रकरणांमध्ये आढळून येत आहेत मात्र या संक्रमित रुग्णांकडून संसर्ग होण्याची धोका कमी असल्याचं मारिया यांनी सांगितलं आहे. 7 / 15WHO कडून आलेले हे विधान आधी आलेल्या बातम्यांपेक्षा वेगळे आहे. जेव्हा मार्च आणि एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या देशांमध्ये एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांची संख्या वाढली होती तेव्हा अशा संसर्गांमुळे कोरोना पसरत असल्याचं म्हटलं गेलं होतं. 8 / 15एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांवरून चीनवरही टीका केली जात आहे. कारण चीननं सुरुवातीच्या काळात वुहानमधील एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांचा कोरोनाच्या यादीमध्ये समावेश नव्हता. 9 / 15WHO च्या निवेदनात आता मात्र लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फारच कमी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 10 / 15विशेष म्हणजे कोरोना साथीच्या संदर्भात WHOच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर थेट हल्ला केला होता. 11 / 15WHO चीनच्या प्रभावाखाली काम करत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. अमेरिकेने WHOला मोठ्या प्रमाणात निधी देण्यास देखील बंदी घातली आहे. 12 / 15मास्क वापरण्याबाबत WHO च्या मार्गदर्शक सूचनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. विशेष म्हणजे जानेवारीमध्ये चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून WHO ने मास्क वापरण्याचा आग्रह धरला नाही. 13 / 15काही दिवसांपूर्वी मास्क संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. परंतु यात देखील संघटनेतर्फे स्पष्टपणे सांगितले गेले आहे की कोरोनाच्या बचावामध्ये केवळ मास्कवर अवलंबून राहणे शक्य नाही.14 / 15कोरोना रुग्णसंख्येच्या यादीत भारत आता सहाव्या क्रमांकावर आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत. 15 / 15देशातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 56 हजारांवर गेली आहे. भारतात लॉकडाऊन उठण्यास सुरुवात झालेली असतानाच देशभरात कोरोनाचे हजारांवर 9 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.