CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 10:30 AM
1 / 15 कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांत कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. 2 / 15 कोरोनाचा धोका वाढला असून आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात सात लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 3 / 15 कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी त्याला यश देखील आले आहे. विविध चाचण्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 4 / 15 जगभरात कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहे. खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. 5 / 15 कोरोनाचा उद्रेक होत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असून अनेकांनी कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे. 6 / 15 जगभरात तब्बल एक कोटीहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 7 / 15 कोरोनाच्या संकटात आशेचा किरण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस अदनोम गेब्रेयसस यांनी याबाबत माहिती दिली आहे. 8 / 15 कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. अद्याप खूप उशीर झालेला नाही. तसेच सर्वच देशांनी कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं म्हटलं आहे. 9 / 15 टेड्रोस यांनी या आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या ही दोन कोटीच्या वर गेली असून जवळपास 7,50,000 लोकांचा मृत्यू झाल्याचं देखील सांगितलं. 10 / 15 व्हायरसचा सामना करण्यासाठी कोणतीही नवीन रणनीती नाही. मात्र आपल्यासमोर न्यूझीलंडचं उदाहरण आहे. त्यांनी ज्या पद्दतीने कोरोनावर नियंत्रण मिळवलं ते महत्त्वाचं आहे. 11 / 15 सर्व देशातील नेत्यानी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत आणि नागरिकांनी नवे उपाय स्वीकारून त्यांचं पालन केलं पाहीजं असंही म्हटलं आहे. 12 / 15 न्यूझीलंडमध्ये गेल्या 100 दिवसांत कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. नवीन उपाय करून कोरोनाला रोखता येतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. 13 / 15 कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र योग्य उपाययोजना आणि त्यांच पालन केल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याने आशा वाढल्या आहेत. 14 / 15 कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटना याबाबत सातत्याने मोलाची माहिती देऊन अपडेट देत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. 15 / 15 भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 22 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 45,257 लोकांना जीव गमवावा लागला आहे. आणखी वाचा