CoronaVirus Marathi News world corona updates new cases death toll 13 august
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण, चिंताजनक आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 8:34 AM1 / 12कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. 2 / 12कोरोनाचा उद्रेक झाला असून सातत्याने धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाचा ग्राफ वेगाने वाढताना दिसून येत आहे. खबरदरीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. 3 / 12जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 4 / 12कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत 20,806,983 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. 5 / 12कोरोनाच्या संकटात अनेकांनी व्हायरसवर मात करून ही लढाई जिंकली आहे. तब्बल 13,706,678 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र याच दरम्यान रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 6 / 12कोरोनाचा धोका वाढला असून चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. 7 / 12जगभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6644 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 8 / 12वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे. महासत्ता अशी ओळख असलेला हा देश कोरोनापुढे हतबल झाला आहे. 9 / 12अमेरिकेत आतापर्यंत 53.60 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाख 69 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. 10 / 12गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची संख्या ही भारत, ब्राझील आणि अमेरिकेतील आहे. तसेच याच तीन देशांमध्ये मृतांचा आकडा देखील वाढत आहे. 11 / 12जगभरातील 20 देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही दोन लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये इराण, पाकिस्तान, तुर्की, इटली, जर्मनी या देशांची समावेश आहे. 12 / 12कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. तर मृतांच्या संख्येत चौथ्या स्थानी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications