CoronaVirus Marathi News : world largest murder hornets spotted in america
कोरोनानंतर अमेरिकेवर आता जीवघेण्या 'मर्डर हार्नेट्स'ची दहशत, घेऊ शकतो अनेकांचा बळी By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 9:21 PM1 / 10आधीच कोरोनापुढे हतबल झालेल्या अमेरिकेत आता 'हा' जीवघेणा किडा पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. पहिल्यांदाच अमेरिकेत आशियातील सर्वात मोठा हॉर्नेट किडा (गांधीलमाशी) दिसून आला आहे. याला 'मर्डर हार्नेट्स' असेही म्हटले जाते.2 / 10सीएनएनने दिलेल्या एका वृत्तानुसार, वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की विशेषत: वॉशिंग्टनमध्ये 'मर्डर हॉर्नेट्स दिसून आले आहेत. हे किडे मधमाशांना मारून टाकतात आणि माणसांसाठीही जीवघेणे ठरू शकतात.3 / 10मधुमक्षिका पालन करणाऱ्या लोकांनी म्हटले आहे, की त्यांना अनेक मेलेल्या मधमाशा दिसल्या. त्यांची डोकी तुटलेली होती. 4 / 10या माशा अत्यंत भयानक असतात. वॉशिंग्टन स्टेट यूनिवर्सिटीतील काही तज्ज्ञांच्या मते, मर्डर हॉर्नेट्स 2 इंचांपेक्षाही अधिक लांब असतात5 / 10मर्डर हॉर्नेट्सना जगातील सर्वात लांब हॉर्नेटदेखील म्हटले जाते. त्यांने डंख मारल्यानंतर अनेकदा माणसाचा मृत्यूही होऊ शकतो.6 / 10मधमाशांच्या पोळावर हल्ला करून हे किडे काही वेळातच सर्व मधमाशांना मारून टाकतात. मर्डर हार्नेट्सचा डंख प्रचंड विषारी असतो.7 / 10मर्डर हार्नेट्सच्या डंख मारन्याने माणसाचे नर्व्हस सिस्टमदेखील बंद पडू शकते. यामुळे अॅलर्जिक रिअॅक्शनदेखील होऊ शकते.8 / 10जपानमध्ये सहजपणे कुठेही आढळणारा हा किडा तेथे दरवर्षी 30 ते 40 जणांचा जीव घेतो.9 / 10मर्डर हार्नेट्स10 / 10मर्डर हार्नेट्स आणखी वाचा Subscribe to Notifications