शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus:…तर १९१८ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची गंभीर शक्यता; कोरोनाबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 9:52 AM

1 / 10
चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसचं संकट जगभरावर कायम आहे, आतापर्यंत १.३५ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५ लाख ८० हजाराहून जास्त मृत्यू झाले आहेत.
2 / 10
धक्कादायक बाब म्हणजे अनेक देशांना मागे टाकत भारत सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जगात तिसर्‍या स्थानी पोहोचला आहे. अमेरिकेनंतर १९.६६ लाख कोरोनाबाधित रुग्ण ब्राझीलमध्ये असून ते दुसर्‍या स्थानावर आहेत आणि ९.३६ लाख संक्रमित रुग्णांसह भारत तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.
3 / 10
अमेरिकेचे मोठे संसर्गजन्य रोग वैज्ञानिक डॉ. एंथोनी फॉसी यांनी असा इशारा दिला आहे की, जगभरातील देशांनी योग्य पध्दतीचा अवलंब न केल्यास कोरोना विषाणू १९१८ मध्ये पसरलेल्या साथीच्या रोगाप्रमाणे गंभीर स्वरुप धारण करील. जॉर्जटाउन विद्यापीठात आयोजित ग्लोबल हेल्थ इनिशिएटिव्ह वेबिनार येथे त्यांनी हे सांगितले.
4 / 10
डॉ. फॉसी म्हणाले की, १९१८ मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लू महामारीमुळे जवळपास ५ ते १० कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. ही जगातील सर्वात भयानक महामारी होती. मला आशा आहे की अशी परिस्थिती कोरोनाबरोबर येणार नाही, परंतु ती सुरूवात झाली आहे.
5 / 10
जगभरातील देशांचे दुर्लक्ष आणि मानवी स्वभाव हा आजार अधिक गंभीर बनवित आहे. तथापि, डॉ. एंथोनी फॉसी यांनी अशी आशा व्यक्त केली आहे की, एक दिवस ही औषध कोरोना आजार रोखण्यास यशस्वी होतील ज्यांची सध्या चाचणी सुरु आहे.
6 / 10
डॉ. एंथोनी फॉसी यांच्यासमवेत वेबिनारमध्ये उपस्थित असलेल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) चे संचालक डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड म्हणाले की, अमेरिकेत ३४ लाखांपेक्षा अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ही संख्या अधिक असू शकते. कारण अद्यापही सर्व लोकांची चाचणी होऊ शकली नाही.
7 / 10
डॉ. रेडफिल्ड यांनी जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे हवाला देऊन सांगितले की, जर कोणतेही औषध यशस्वी झाले नाही तर कोरोना व्हायरसशी लढायला आपल्याला 2 ते 3 वर्षे लागतील. परंतु सर्वात धोकादायक म्हणजे २०२१ चे पहिले चार महिने लोकांना खूप कठीण जाणार आहेत.
8 / 10
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, सध्या जगभरात १.३५ कोटीहूनही अधिक लोक कोरोना विषाणूमुळे संक्रमित आहेत. सर्वाधिक संक्रमित ३४.९५ लाख लोक अमेरिकेत आहेत. बहुतांश मृत्यू अमेरिकेतच झाले आहेत. येथे १.३७ लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत
9 / 10
दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अ‍ॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे. अ‍ॅस्ट्रा झिनेका (AstraZeneca) या कंपनीने या व्हॅक्सिनचे लायसन्स मिळविले आहे. ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींवर प्रभावी ठरली आहे. परंतू अद्याप पहिल्या मानवी चाचणीचे अहवाल यायचे आहेत.
10 / 10
मात्र सध्यातरी कोरोना महामारीला रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची लस अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नसून जगभरातील अनेक वैज्ञानिक या आजारातून लोकांना वाचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका