Coronavirus: More than 5 lakh AIDS patients will die in next 6 months; WHO report pnm
Coronavirus:...तर येत्या ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त एड्स रुग्णांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 9:49 AM1 / 10कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात २ लाख ९७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ४३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग थांबवण्याचा कोणताही उपाय सापडला नाही. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे एड्सच्या पाच लाख रूग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता एका अभ्यासातून समोर आली आहे.2 / 10जागतिक आरोग्य संघटना आणि यूएनएड्सच्या मॉडेलिंग अभ्यासानुसार आफ्रिकेच्या सब-सहारन भागात पुढील ६ महिन्यांत ५ लाखांहून अधिक एड्स रूग्णांचा मृत्यू होईल. असं झालं तर २००८ एड्समुळे मरण पावलेल्यांचा हा विक्रम मोडेल3 / 10२०१० पासून आफ्रिकेत लहान मुलांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी झाले होते. हे अँटीरेट्रोव्हायरल (एआरव्ही) थेरपीमुळे शक्य झालं. परंतु जर त्यांना योग्य वेळी औषध आणि थेरपी मिळाली नाही तर मोझांबिकमध्ये पुढील सहा महिन्यांत ३७ टक्के रुग्णांची संख्या वाढेल. मलावी आणि झिम्बाब्वेमध्ये प्रत्येकी ७८ टक्के आणि युगांडाच्या १०४ टक्के मुलांना एचआयव्हीची लागण होऊ शकते.4 / 10डब्ल्यूएचओ आणि यूएनएड्स यांनी त्यांच्या अभ्यासानुसार अहवाल दिला आहे की, सन २०१८ मध्ये २५७ कोटी लोक सब-सहारन आफ्रिकेत एचआयव्ही पीडित होते. त्यापैकी ६४ टक्के अँटीरेट्रोव्हायरस (एआरव्ही) थेरपीच्या सहाय्याने जिवंत आहेत.5 / 10आता कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर या भागांची आरोग्य यंत्रणा ढासळली आहे. एचआयव्ही क्लिनिकमध्ये एआरव्ही पुरविली जात नाही. एड्स रूग्णांना औषधांचा डोस नाही6 / 10डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की पृथ्वीवरील एड्स, टीबी, मलेरिया यासारख्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी कोरोना विषाणू किती धोकादायक आहे, हे या अभ्यासातून दिसून येते. अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना भलेही कोरोनाची लागण नसेल तरीही कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांना अधिक त्रास होऊ शकतो7 / 10डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेडरोस यांनी हा अहवाल विचित्र परिस्थिती निर्माण करीत असल्याची खंत व्यक्त केली. जर आफ्रिकेत एड्स संबंधित आजारामुळे ५ लाख लोकांचा मृत्यू मृत्यू झाला तर ते आपल्याला पुन्हा इतिहासात परतावं लागेल8 / 10आपल्याला जागरुक होणे आवश्यक आहे. केवळ कोरोनाच नाही तर इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांचेही यामुळे संरक्षण करावे लागेल. डॉ. टेडरोस यांनी जगभरातील कंपन्या व आरोग्य-संबंधित लोकांना एड्स-संबंधी चाचणी किट आणि औषधांची संख्या वाढवून आफ्रिकेत लोकांना मदत करण्यास सांगितले आहे.9 / 10आफ्रिकेत एचआयव्ही पसरण्याचा धोकाही वाढला आहे, कारण तेथे कंडोमची कमतरता आहे. याशिवाय एआरव्ही थेरपी, टेस्टिंग किट इत्यादींचीही कमतरता आहे. आफ्रिकेत एड्स किंवा एचआयव्ही ग्रस्त लोकांनी वेळेवर एआरव्ही थेरपी घेणे आवश्यक आहे.10 / 10एआरव्ही थेरपी पूर्ण न झाल्यास एचआयव्ही विषाणूचे प्रमाण शरीरात वाढू लागते. अशी व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारे संक्रमित करते तर एड्सच्या रुग्णांची संख्याही वाढेल असा धोका सांगण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications