शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: 'या' देशातील कोरोना लसीमुळे गंभीर आजाराची शक्यता; तज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 3:13 PM

1 / 6
संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाचा कहर सुरू आहे. काही मोजक्या देशांना कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश आले असले तरी अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला आहे.
2 / 6
कोरोनाचा जोर ओसरणे तर दूर अद्याप संसर्गाने उच्चांक गाठला नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे.
3 / 6
चीनमध्ये देखील जवळपास चार कंपनीत कोरोनाची लस तयार करण्यास काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. Sinovac कंपनीची कोरोनाच्या लसीच्या पॅकेटवर थेट लिहण्यात आले आहे की, या लसीसाठी चीनमधील नेशनल मेडिकल प्रोडक्स एडमिनिस्ट्रेशनकडून परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु The Epoch Timesच्या रिपोर्चनूसार, चीनमधील एक सरकारी कंपनीने काही कर्मचाऱ्यांना लस टोचणं अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.
4 / 6
theepochtimes.com ला TravelSky Technology नावच्या कंपनीची एक अधिकृत अहवाल समोर आला आहे. या अहवालमध्ये काही कंपनीतील कर्मचाऱ्यांना या कोरोनाच्या लसीच्या ट्रायलसाठी सहभागी होण्यासाठी सांगितले होते. तसेच तज्ज्ञांना दावा आहे की, यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका आहे.
5 / 6
अमेरिकन सोसायटी ऑफ टॉक्सिकॉलॉजीचे सदस्य आणि हांगकांगच्या चिनी विद्यापीठाशी संबंधित असलेल्या चॅन किंग मिंग म्हणतात की, ही लस खूप धोकादायक आहे. तसेच ही लस कोरोनावर प्रभावी देखील ठरणार नाही.
6 / 6
तसेच ही लस प्रभावी ठरली नाहीतर याला जबाबदार कोण असेल, असा सवालही चान किंग मिंग यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे चीन या कंपनीवर काही कारवाई करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय