शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! चीनमध्ये एकाच वेळी सापडले 166 पॉझिटिव्ह; आता सर्वांचीच होणार चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:28 PM

1 / 12
चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. एका बारमध्ये आलेल्या 166 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या 6,158 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. (फोटो-AP)
2 / 12
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 275 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 134 लक्षणे नसलेले आणि 141 लक्षणे असलेले रुग्ण होते. याच्या एक दिवस आधी 210 प्रकरणे आढळून आली होती. (फोटो-AP)
3 / 12
बीजिंगमधील चाओयांग जिल्ह्यातील सॅनलीतू भागातील हेवन सुपरमार्केट बारमधून पसरलेल्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तीन कोरोना चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो-AP)
4 / 12
आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की 166 पैकी 145 लोक बारमध्ये गेले होते, तर उर्वरित लोक त्यांच्या संपर्कात आले होते. शहर प्रशासनाचे प्रवक्ते शू हाजियन म्हणाले की, एप्रिलच्या उत्तरार्धात बीजिंगमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी झाल्याने नियम हळूहळू शिथिल केले जात होते.
5 / 12
झिरो कोरोना धोरण अजूनही सुरू आहे, ज्या अंतर्गत संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. सरकारी प्रवक्त्याने चेतावणी जारी होताच बीजिंगच्या दोन जिल्ह्यांतील नाइटक्लब, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि काही मनोरंजन स्थळे बंद करण्यात आली आहेत असं सांगितलं.
6 / 12
चीन सरकारच्या आकडेवारीनुसार, 140 कोटी लोकसंख्येच्या देशात कोरोनामुळे केवळ 5,226 मृत्यू झाले आहेत. मात्र, चीनच्या या आकडेवारीवर अमेरिकेसह अनेक देशांनीही शंका व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
7 / 12
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. चीनमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जातं. मात्र आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टला चीनने उत्तर दिलं आहे.
8 / 12
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टनंतर चीनने हे विधान केलं आहे, ज्यामध्ये प्रयोगशाळेतून व्हायरस लीक होण्यासाठी जबाबदार धरण्याआधी अधिक सखोल तपास करणे आवश्यक आहे असं म्हटलं आहे.
9 / 12
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनीही चीन तपासकर्त्यांना पूर्ण सहकार्य करत नसल्याचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की चीन विज्ञान-आधारित तपासणीचे स्वागत करतो, परंतु राजकीय हेराफेरी नाकारतो.
10 / 12
जेव्हा कोरोना व्हायरसचा प्रसार सुरू झाला आणि त्याने जगभर हाहाकार माजवला, तेव्हा सर्वांच्या नजरा चीनकडे लागल्या होत्या. चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या देशांमध्ये जास्त आणि चीनमध्ये कमी दिसला.
11 / 12
जेव्हा कोरोना व्हायरसचा प्रसार सुरू झाला आणि त्याने जगभर हाहाकार माजवला, तेव्हा सर्वांच्या नजरा चीनकडे लागल्या होत्या. चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या देशांमध्ये जास्त आणि चीनमध्ये कमी दिसला.
12 / 12
कोरोना व्हायरसमुळे पसरलेल्या कोविड-19 साथीचे मूळ शोधण्यासाठी WHO ने एक विशेष गट तयार केला आहे. आता या विशिष्ट गटाचे म्हणणे आहे की या संदर्भात अधिक अभ्यासाची गरज आहे. चीनच्या प्रयोगशाळेतून व्हायरस लीक झाल्याचा अधिक अभ्यास करायला हवा.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन