शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! लवकरच येणार कोरोनाचा नवा व्हेरिएंट?; WHO ने दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 5:30 PM

1 / 12
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 60 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे आणि याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड-19 च्या येणाऱ्या व्हेरिएंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
2 / 12
कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणे आणि संक्रमणाची वाढ लक्षात घेता, WHO च्या कोविड-19 तांत्रिक टीमच्या प्रमुख मारिया वान केरखोव (Maria Van Kerkhove) यांनी लोकांना भविष्यात आणखी संसर्गजन्य व्हेरिएंटबद्दल इशारा दिला आहे आणि त्यांच्यापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील केलं आहे. जगभरात वेगाने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
3 / 12
WHO च्या मारिया वान केरखोव यांनी जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे आणि अनेक ट्विट केले आहेत. ट्विट करून, मारिया यांनी स्पष्ट केले की मूलभूत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने कोरोना व्हायरस आणि मृत्यूचा प्रसार रोखण्यात मदत होऊ शकते.
4 / 12
गेल्या 4 आठवड्यात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये 15 टक्के आणि मृत्यूंमध्ये 35 टक्के वाढ झाली आहे. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपायांच्या मर्यादित वापरामुळे नवीन रुग्ण समोर येत राहतील. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
5 / 12
मारिया वान केरखोव यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे आणि सध्या त्याचा सब व्हेरिएंट BA.5 चे झपाट्याने वाढणारे संक्रमण हे चिंतेचे प्रमुख कारण आहे. यासोबतच, कोविड-19 चे नवीन प्रकार आगामी काळात अधिक संसर्गजन्य असू शकतात आणि त्याच्या तीव्रतेबद्दल अद्याप काहीही सांगता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
6 / 12
शास्त्रज्ञांनी अलीकडील संशोधनाच्या आधारे सांगितले आहे की ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.5 लोकांसाठी अनेक प्रकारे समस्या निर्माण करू शकतो. इतर प्रकारांच्या तुलनेत री-इन्फेक्शन म्हणजेच पुन्हा संसर्ग होण्याचा धोकाही अधिक सांगितला जात आहे. त्याच वेळी, दुसर्‍या संशोधनात असे आढळून आले आहे की लाँग कोरोना झालेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
7 / 12
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. एकूण रुग्णांची संख्या तब्बल 601,902,915 आहे. तर आतापर्यंत 6,474,618 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 576,551,785 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 12
कोरोनाने पुन्हा एकदा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत देशभरात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असून संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक राज्यात पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे.
9 / 12
दिल्लीसह भारतातील अनेक शहरांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, शास्त्रज्ञांना भीती आहे की वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट 'सेंटॉरस' आहे जो पुढील जागतिक कोरोना व्हेरिएंटमधून सिद्ध होऊ शकतो पण सध्या तो किती धोकादायक आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
10 / 12
कोरोना व्हायरस हा सातत्याने म्यूटेट होत आहे म्हणूनच नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. कोरोना सेंटॉरसचा हा नवीन व्हेरिएंट आतापर्यंत जवळपास 20 देशांमध्ये पसरला आहे आणि त्याचा प्रसार खूप वेगाने होत आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दिलासा देणारी बाब आहे की मजबूत प्रतिकारशक्तीमुळे भारतासह सर्व देशांमध्ये त्याचा प्रभाव कमी दिसत आहे.
11 / 12
कोरोना संसर्गामध्ये वेगाने वाढ होत असूनही सेंटॉरसने संक्रमित असलेल्या रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सेंटॉरस हा Omicron BA.2.75 चा नवीन व्हेरिएंट आहे, जो भारतात वेगाने वाढत आहे. BA.2.75 हा इतर Omicrons पेक्षा हे अद्याप कमी किंवा जास्त धोकादायक असल्याचे दिसत नाही.
12 / 12
कोरोनाच्या म्युटेशनने चिंता वाढवली आहे. भारतात सेंटॉरसचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. परंतु असे म्हटले जात आहे की ओमायक्रॉनचे हे नवीन व्हेरिएंट सेंटॉरस BA.5 ची जागा घेईल, कदाचित लवकरच हा भारतातील कोरोनाचे मुख्य सब व्हेरिएंट बनेल. हे शक्य आहे की, इतर अधिक संसर्गजन्य सब व्हेरिएंटप्रमाणेच, तो जगभर पसरला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या