CoronaVirus News covid vaccine russia registers world first covid 19 vaccine for animals sputnik
CoronaVirus Vaccine : मोठा दिलासा! आता पाळीव प्राणीही कोरोनापासून राहणार सुरक्षित; 'या' देशाने बनवली पहिली लस By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 3:20 PM1 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती समोर येत आहे.2 / 15काही देशांमध्ये प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी दोन पाळीव मांजरांना तसेच इतरही प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली होती.3 / 15कोरोनाचा पाळीव प्राण्यांना देखील धोका आहे. कोरोनाच्या नवा स्ट्रेनपासून जगभरातील पाळीव प्राणी देखील वाचू शकलेले नाहीत. मात्र आता कोरोनाच्या महाभयंकर संकटात एक दिलासादायक घटना समोर आली आहे. 4 / 15पाळीव प्राण्यांनाही कोरोना होऊ नये म्हणून रशियाने चक्क पाळीव प्राण्यांसाठी कोरोनाची लस तयार केली आहे. त्यामुळे कोरोनापासून पाळीव प्राण्यांचं संरक्षण होणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित रोजेलखोनाजोर या संस्थेने याबाबतची घोषणा केली आहे.5 / 15Carnivac-Cov असं रशियाने तयार केलेल्या लसीचं नाव आहे. रशियाच्या फेडरल सेंटर फॉर अॅनिमल हेल्थने ही लस तयार केली आहे. सुरुवातीच्या ट्रायलमध्ये या लसचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. 6 / 15एप्रिलपासून या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाणार आहे, अशी माहिती या संस्थेने दिली आहे. ग्रीस, ऑस्ट्रेलिया, पोलंड, कॅनडा, अमेरिका आमि सिंगापूर आदी देशांनी ही लस खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळत आहेत. 7 / 15श्वान, मांजर, बर्फाळ भागात राहणारे कोल्हे, उंदीर, कोल्हा आणि इतर प्राण्यांवर या Carnivac-Cov लसीची क्लिनीकल ट्रायल करण्यात आली आहे. ही ट्रायल गेल्यावर्षी ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्याआधारे ही लस प्राण्यांसाठी सुरक्षित आणि संरक्षक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 8 / 15रोजेलखोनाजोरचे उपप्रमुख कॉन्स्टेनटीन सावेनकोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीमुळे प्राण्यांना कोणतंही नुकसान होणार नाही. या लसीमुळे प्राण्यांची इम्युनिटी वाढेल. तसेच त्यांच्या शरीरात शंभर टक्के अँटीबॉडीज विकसित होतील.9 / 15अमेरिका आणि फिनलँडमध्येही प्राण्यांसाठी कोरोना लस तयार करण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पाळीव प्राण्यांबद्दल लोकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे पाळीव प्राण्यांमध्येही कोरोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.10 / 15रशियातच पहिली मानवी कोरोना लस तयार करण्यात आली होती. मात्र या लसीवर अनेक देशांनी शंका उपस्थित केली होती. एवढेच नव्हे तर रशियन नागरिकही ही लसीला घाबरत आहेत. लसीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 11 / 15स्पुतनिक-व्ही लस 92 टक्के प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाळीव प्राण्यांपासून माणसांना कोरोनाची लागण होतो याचा कोणताही पुरावा समोर आला नाही असं देखील रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे. 12 / 15श्वान, मांजर या पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग माणसांना होण्याचा धोका नाही असं रिसर्चमधून समोर आलं आहे. मात्र काळजी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. 13 / 15पाळीव प्राण्यांपासून कोरोनाची लागण होण्याचा धोका अतिशय कमी असल्याचं याआधी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे14 / 15जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी काही प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, पाळीव प्राण्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं होतं15 / 15प्राण्यांमुळे माणसांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications