शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : चिंताजनक! डेल्टा, ओमायक्रॉन... कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य?; WHOचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 3:19 PM

1 / 14
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 40 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत.
2 / 14
सध्या कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत आहे. तसेच नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढतं आहे. कोरोनातून अनेक जण बरे झाले असून त्यांनी उपचारानंतर व्हायरसवर मात केली आहे.
3 / 14
जागतिक आरोग्य संघटनेने आता कोरोनाच्या संकटात एक धोक्याचा इशारा दिला आहे. अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, ओमायक्रॉननंतर आता कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट हा अधिक संसर्गजन्य असू शकतो असं म्हटलं आहे.
4 / 14
डब्ल्यूएचओच्या डॉ. मारिया वान केरखोव यांनी कोरोना अद्याप गेलेला नाही. त्याचा नवीन व्हेरिएंट आणखी संसर्गजन्य असेल, कारण तो इतर व्हेरिएंटना मागे टाकेल. हा सौम्य आणि गंभीर दोन्ही असू शकतो आणि आपली प्रतिकारशक्ती कमी करू शकतो असं म्हटलं आहे.
5 / 14
कोणत्याही व्हायरसमध्ये कालांतराने बदल होतात, ज्यामुळे तो निसर्गात टिकून राहू शकतो. बहुतेक व्हायरस त्यांच्या गुणधर्मांमध्ये फारसा बदल करत नाहीत, परंतु काही व्हायरस आहेत ज्यात लस आणि उपचारांशी लढा दिल्याने ते बदलतात.
6 / 14
अशाप्रकारे व्हायरसचे नवीन व्हेरिएंट तयार होतात, ज्यामुळे आपल्यासाठी धोका निर्माण होतो. लोकांसाठी एक प्रकार किती धोकादायक आहे यावर जागतिक आरोग्य संघटना (WHO) त्याला व्हेरिएंट ऑफ कंसर्न (VoC) घोषीत करते.
7 / 14
आतापर्यंत 5 व्हेरिएंट्स आहे. यामध्ये अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमायक्रॉन VoC घोषित केले गेले आहेत. ते माणसांमध्ये त्यांच्या वेगाने प्रसारासाठी, त्यांना गंभीरपणे संक्रमित करण्यासाठी आणि त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत.
8 / 14
अल्फा व्हेरिएंट (B.1.1.7) सर्वप्रथम सप्टेंबर 2020 मध्ये ब्रिटनमध्ये आढळून आला. बीटा व्हेरिएंट (B.1.351) प्रथम दक्षिण आफ्रिकेने मे 2020 मध्ये शोधला होता. गामा व्हेरिएंट (P.1) नोव्हेंबर 2020 मध्ये ब्राझीलमध्ये आढळला.
9 / 14
नेचर जर्नलमधील अहवालानुसार, या तिन्ही व्हेरिएंटमध्ये काही म्य़ूटेशन समान आहेत. ते खराब प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना लक्ष्य करतात आणि त्यांचा संसर्ग काही महिने टिकू शकतो.
10 / 14
डेल्टा व्हेरिएंट (B.1.617.2) भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळला. हे अल्फा व्हेरिएंटपेक्षा 60% अधिक संसर्गजन्य आहे, म्हणून शास्त्रज्ञ त्याला सुपर अल्फा म्हणतात. Omicron प्रकार (B.1.1.529) दक्षिण आफ्रिकेने नोव्हेंबर 2021 मध्ये नोंदवला होता.
11 / 14
ओमायक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये इतर प्रकारांपेक्षा जास्त म्यूटेशन होते, ज्यामुळे ते वेगाने पसरते. हा व्हायरस मानवी शरीरात केवळ स्पाइक प्रोटीनच्या मदतीने प्रवेश करतो. कोरोनाचा वेगाने प्रसार होतो.
12 / 14
मारिया वान केरखोव यांचे मत आहे की, ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा प्रकार नाही. आम्हाला भविष्यात इतर व्हेरिएंट सापडल्याच्या बातम्या देखील मिळू शकतात. त्या प्रकारांमध्ये कोणत्या प्रकारचे म्यूटेशन होईल हे सांगणे सध्या कठीण आहे.
13 / 14
नेचर जर्नलमधील एका अहवालात शास्त्रज्ञ जेसी ब्लूम यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही. तो स्थानिक अवस्थेत येईल, म्हणजेच व्हायरस कमकुवत होईल आणि लोक त्याच्यासोबत जगायला शिकतील. हा एक सामान्य आजार होईल.
14 / 14
शास्त्रज्ञ अँड्र् रॅम्बोट म्हणतात की, ओमायक्रॉनचा संसर्ग सौम्य असल्यामुळे पुढील व्हेरिएंट अतिशय सौम्य मानणे योग्य नाही. असे होऊ शकते की आगामी व्हेरिएंट धोकादायक होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाCorona vaccineकोरोनाची लस