CoronaVirus News: first covid 19 vaccine tested in America ready for the final testing
गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 11:36 AM1 / 10जगभरात कोरना व्हायरसच्या लसीचे परीक्षण सुरू आहे. आता या लसींचे निकालही समोर येत आहेत. आता याच साखळीत मॉडर्ना इंकचेही (Moderna Inc.) नाव जोडले गेले आहे. अमेरिकेत सर्व प्रथम परीक्षण केल्या गेलेल्या COVID-19 (CoronaVirus) च्या पहिल्या दोन टप्प्यांवरील परीक्षणाच्या निकालामुळे वैज्ञानिक अत्यंत आनंदात आहेत. 2 / 10आता या लसीचे अखेरचे परीक्षण केले जाणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, मंगळवारी आलेल्या रिपोर्टमधून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे, या लसीकडून वैज्ञानिकांना जी अपेक्षा होती, अगदी त्याच प्रकारे या लसीने लोकांच्या इम्यून सिस्टिमवर काम केले आहे. 3 / 10एपी या वृत्त संस्थेशी बोलताना, अमेरिकन सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फॉसी म्हणाले, 'ही एक अत्यंत चांगली बातमी आहे. ही प्रायोगिक लस नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि मॉडर्ना इंक एकत्रितपणे तयार करत आहेत. या लसीचे सर्वात आवश्यक आणि अखेरच्या टप्प्यावरी परीक्षण 27 जुलैच्या जवळपास होईल. 4 / 10मार्च महिन्यात तब्बल 45 जणांवर या लसिची पहिली चाचणी करण्यात आली. सर्वच संशोधक या चाचणीच्या निकालाची आतूरतेने वाट पाहत होते. मंगळवारी आलेल्या निष्कर्षांत या लसीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्याची आशा वाढली आहे.5 / 10वैज्ञानिकांच्या चमूने New England Journal of Medicine ला दिलेल्या माहितीनुसार, चाचणी करण्यात आलेल्या स्वयंसेवकांमध्ये संसर्ग थांबवणाऱ्या न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत.6 / 10या संशोधनाचे नेतृत्व करणारे, सीएटलमध्ये कॅन्सर परमनंट वाशिंग्टन रिसर्च इंस्टीट्यूटचे डॉक्टर लिसा जॅक्सन म्हणाले, 'ही एक अत्यंत महत्वाची कडी आहे, हिच्या सहाय्यानेच परीक्षणात पुढे वाटचाल करण्याची गरज आहे. यामुळे, ही लस मानवाचा संक्रमणापासून बचाव करण्यास सक्षम आहे का, हे निश्चित होईल.'7 / 10ही लस केव्हापर्यंत येईल यासंदर्भात अद्याप काहीही सांगितले जाऊ शकत नाही. मात्र, सरकारला आशा आहे, या वर्षाच्या अखेरपर्यंत लसीचे निकाल येतील. ही लस अत्यंत वेगाने विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या लसीचे दोन डोस दिले जातील.8 / 10संशोधनात या व्हॅक्सीनचे कसल्याही प्रकारचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. पण, संशोधनात सहभागी असलेल्या अर्ध्याहून अधिक लोकांनी फ्लू सारख्या लक्षणांची तक्रार केली आहे. 9 / 10मात्र, फ्यूच्या तक्रारी साधारणपणे सर्वच प्रकारच्या व्हॅक्सीनचा डोस घेतल्यानंतर दिसूत येतात. यात थकवा येणे डोकेदुखी, थंडी वाजने, ताप अथवा इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे या सर्वसामान्य गोष्टी आहेत.10 / 10व्हेंडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे डॉक्टर विल्यम शेफनर यांनी, लसीच्या सुरुवातीचे निकाल म्हणजे, एक चांगले पाऊल आणि आशादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच, ही लस, पुढील वर्षापर्यंत उपलब्ध करण्यासाठी खरोखरच सुरक्षित आणि प्रभावी आहे का? हे अखेरच्या टप्प्यात स्पष्ट होईल, असेही शेफनर म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications