CoronaVirus News: Russia will be the first to give corona vaccine to 'this' country ...
CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस... By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 5:16 PM1 / 11कोरोना विषाणूची लस रजिस्टर करणारा रशिया जगातील पहिला देश आहे. रशिया आता आपली लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) बेलारूसला पुरवणार आहे. बेलारूस हा रशियाची लस प्राप्त करणारा पहिला देश असणार आहे.2 / 11themoscowtimes.com च्या वृत्तानुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना लसीची पहिली तुकडी पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये यासंदर्भात फोनवर चर्चा झाली आहे. 3 / 11दरम्यान, बेलारूसमध्ये सध्या सरकारविरोधी निदर्शने सुरु आहेत. या महिन्यात बेलारूसमध्ये निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला.4 / 11रिपोर्टनुसार, पुतीन यांनी अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासमवेत देशातील परिस्थितीविषयी चर्चा केली आणि कोरोना लस पाठविण्यास सांगितले.मात्र, बेलारूसमध्ये केवळ स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. कारण, रशिया सध्या या लसीच्या तिसर्या फेरीची चाचणी घेत आहे. तिसऱ्या फेरीच्या चाचण्यापूर्वी रशियाने ही लस यशस्वी झाल्याचे जाहीर केले होते.5 / 11बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी कोरोनावर मात करण्यासाठी सुरुवातीपासून अनेक प्रयत्न केले. आतापर्यंत बेलारूसमध्ये 70 हजाराहून अधिक कोरोना प्रकरणे अधिकृतपणे नोंदली गेली आहेत.6 / 11जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनच्या वुहानमधून कोरोना जगभरात पसरला आणि काही काळातच जगाला विळखा घातला. 7 / 11कोरोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. अनेक देशातील उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अमेरिका, रशिया, इटली, ब्रिटन यांसारखा देशांमध्ये सुद्धा कोरोनाने हाहाकार माजला आहे.8 / 11भारतात सुद्धा कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 31,67,324 वर गेला आहे. 9 / 11देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 60,975 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 848 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 58,390 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.10 / 11दरम्यान, कोरोनापासून बचावासाठी जगभरात कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. अनेक देशांत कोरोनावरील लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतात सुद्धा सध्या तीन लसींवर चाचणी सुरु आहे.11 / 11दरम्यान, कोरोनापासून बचावासाठी जगभरात कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. अनेक देशांत कोरोनावरील लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतात सुद्धा सध्या तीन लसींवर चाचणी सुरु आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications