शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! एका व्यक्तीने नियम मोडला पण हजारो लोकांना फटका बसला; झाले क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 2:20 PM

1 / 8
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने कोट्यवधींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 8
कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. चीनमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जातं. आता पुन्हा एकदा चीनची चिंता वाढली आहे.
3 / 8
चीनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चीनने कोरोनाचा धसका घेतला आहे. एका व्यक्तीने नियम मोडला पण हजारो लोकांना त्याचा फटका बसला आहे. यामुळे हजारो लोक क्वारंटाईन झाले आहेत.
4 / 8
बीजिंगमध्ये एका व्यक्तीने नियम मोडल्याने हजारो लोकांना क्वारंटाईन व्हावं लागलं आहे. यानंतर ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाच आठवड्यांपासून लोकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
5 / 8
स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका 40 वर्षीय व्यक्तीने नियम मोडला आणि तो घराबाहेर शॉपिंग करताना आढळला. घरामध्ये क्वारंटाईन राहायला सांगितलेलं असताना देखील हा माणूस फिरताना आढळला.
6 / 8
धक्कादायक बाब म्हणजे 40 वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या पत्नीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर जवळपास 5000 लोकांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर 250 लोकांना सरकारच्या आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
7 / 8
बीजिंगमध्ये नियमांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आला आहे. या अंतर्गत पार्क, संग्रहालय, थिएटर पुन्हा सुरू करण्यात आले आबेत. चीनमध्ये कडक लॉकडाऊनचं पालन केलं जात आहे. झिरो कोविड पॉलिसी राबवण्यात येत आहे.
8 / 8
बीजिंगमध्ये एप्रिलच्या शेवटी 1700 हून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत थोडी घट झाली. परिस्थिती थोडी सुधारत असली तरी धोका अद्याप कायम असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन