CoronaVirus News : When will the corona infection end? The answer given by 511 experts ...
CoronaVirus News : कधी संपणार कोरोनाचा संसर्ग? 511 तज्ज्ञांनी दिलं असं उत्तर... By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:53 PM1 / 10जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव किंचित कमी झाला आहे. मात्र, असे बरेच देश आहेत. त्याठिकाणी कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत न्यूयॉर्क टाईम्सने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 511 तज्ज्ञांसोबत एक सर्वेक्षण केले आहे.2 / 10या सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोरोनाच्या परिणामामुळे आगामी काळात तज्ज्ञांचे आयुष्य कसे असेल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान, तज्ज्ञांनी लोकांसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली नाहीत, मात्र, त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी सांगितले आहे.3 / 10काही तज्ज्ञांनी आधीच डॉक्टरांना भेट देऊन लहान गटात सामील होण्यास सुरवात केली आहे. परंतु बहुतेक तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, जोपर्यंत लस किंवा उपचार येत नाही तोपर्यंत त्यांनी मोठ्या मैफिली, क्रीडा इव्हेंट, धार्मिक कार्यक्रमांमध्ये जाणार नाही.4 / 10कोरोनावर लस येण्यास एक वर्ष लागू शकेल. त्यामुळे बऱ्याच तज्ज्ञांनी सांगितले की, ते कधीही लोकांची गळाभेट घेणार नाहीत किंवा कोणलाही हात मिळवणार नाहीत.5 / 10कोरोना संकट काळात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीत जगत आहे. प्रत्येकाकडे जोखीम घेण्याची क्षमता, अपेक्षा वेगवेगळ्या असतात. यावेळी चाचणी, संपर्क ट्रेसिंग, उपचार कसे चालू आहेत हे पाहणे देखील आवश्यक आहे. या गोष्टींच्या आधारे ते निर्णय घेतील, असे तज्ज्ञांनी सांगितले.6 / 1060 टक्के तज्ज्ञांनी सांगितले की, फार महत्वाची भेट नसली तरीही ते उन्हाळ्यात डॉक्टरांना भेटायला जातील. 29 टक्के म्हणाले की, अशा परिस्थितीत ते 3 ते 12 महिने वाट पाहता येईल. याशिवाय, एका वर्षापेक्षा जास्त काळ कोणाचाही भेट घेणार नसल्याचे 11 टक्के तज्ज्ञांनी सांगितले.7 / 10उन्हाळ्यात एका रात्रीसाठी सुट्टीवर जवळच्या ठिकाणी गाडीने जाण्यास 56 टक्के तज्ज्ञांनी इच्छा वर्तविली. तर 26 टक्के हे 3 ते 12 महिन्यांनंतर असे करतील आणि 18 टक्के एका वर्षानंतर छोट्या सुट्यांमध्ये जातील, असे सांगण्यात आले.8 / 1019 टक्के तज्ज्ञांनी सांगितले की, ते सलूनमध्ये जाऊन केस कापण्यासाठी वर्षभरापेक्षा जास्त वेळ थांबतील. तर 39 टक्के म्हणाले की, ते 3 ते 12 महिने थांबतील. 41 टक्के तज्ज्ञांचे असे मत आहे की, ते उन्हाळ्यात सलूनमध्ये जातील.9 / 1046 टक्के तज्ज्ञांनी असे सांगितले की 3 ते 12 महिन्यांनंतर छोट्या डिनर पार्टी केल्या जातील. तर 32 टक्के तज्ज्ञांनी उन्हाळ्यात लहान डिनर पार्टीमध्ये सहभाग घेतला जाईल, असे सांगितले. तसेच, 21 टक्के तज्ज्ञांनी जवळपास एक वर्ष तरी असे काही करणार नसल्याचे म्हटले आहे.10 / 10दरम्यान, उन्हाळ्यात केवळ 20 टक्के तज्ज्ञांनी विमान प्रवासाची इच्छा व्यक्त केली आहे. 44 टक्के तज्ज्ञ 3 ते 12 महिन्यांनंतर विमान प्रवास करू इच्छित आहेत, तर 37 टक्के तज्ज्ञांना एका वर्षापेक्षा अधिक काळ विमान प्रवास सुद्धा करायचा नाही आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications