Coronavirus: Omicron may bring another new and dangerous Covid variant, warns WHO
Coronavirus: 'Omicron' मुळे जगाला आणखी एका घातक कोरोना व्हेरिएंटचा धोका? WHO नं केले सतर्क By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 2:18 PM1 / 10ओमायक्रॉनचा(Omicron) धोका जगभरात पसरला आहे. अशावेळी जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) कोरोना व्हायरसच्या नव्या आणि अस्तित्वात असलेल्या व्हेरिएंटपेक्षाही धोकादायक व्हेरिएंटचा इशारा दिला आहे. जगभरात ओमायक्रॉनचे वाढते रुग्ण लक्षात घेता एक नव्या आणि धोकादायक व्हेरिएंटचा धोका वाढण्याचे संकेत WHO ने दिलेत. 2 / 10दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट जगातील ९० हून अधिक देशात पसरला आहे. जेव्हा सुरुवातीला हा व्हेरिएंट समोर आला तेव्हा त्याच्या संक्रमणाबद्दल आणि गंभीरतेवर अनेक अंदाज वर्तवण्यात आले होते. परंतु ओमायक्रॉनचं संक्रमण खूप सौम्य असल्याचं दिसत आहे. 3 / 10कोरोना महामारी लवकरच संपुष्टात येईल आणि जनजीवन पुन्हा पुर्वपदावर येईल अशीही चर्चा सुरु झाली आहे. परंतु WHO ने सतर्क केले आहे की, सर्वकाही इतक्या सहजपणे संपणार नाही तर येणाऱ्या काळात आणखी परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.4 / 10WHO चे वरिष्ठ अधिकारी कॅथरिन स्मॉलवूडने AFP शी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, ओमायक्रॉनच्या संक्रमणाचा वाढता दर विपरित परिणाम टाकू शकतो. ओमायक्रॉन जितक्या वेगाने पसरत आहे. तितक्याच वेळे कोरोनाच्या स्वरुपात बदल होत आहे. 5 / 10कोरोनाच्या स्वरुपात बदल झाल्यास त्यातून आणखी नवीन व्हेरिएंट निर्माण होण्याचा धोका आहे. ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने कमी घातक असून त्यातील मृत्यूदरही कमी आहे. परंतु ओमायक्रॉननंतर येणारा व्हेरिएंट किती धोकादायक असू शकतो याबाबत आत्ताचं सांगता येणार नाही.6 / 10कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळानंतर युरोपात १० कोटींपेक्षा जास्त कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. २०२१ च्या अखेरच्या आठवड्यात ५० लाखांपेक्षा जास्त कोविड रुग्ण आढळले. कोरोनाची ही स्थिती खूप भयंकर आहे असं WHO अधिकारी कॅथरिन स्मॉलवूड यांनी सांगितले.7 / 10सध्या आपण धोकादायक स्थितीत आहोत. पश्चिमी यूरोपतील संक्रमण दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा प्रभाव किती असेल हे स्पष्ट नाही. भलेही ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येत नसली तरी हा व्हेरिएंट ज्या वेगाने पसरतोय त्यामुळे धोका आणखी वाढत आहे.8 / 10ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली तर मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संक्रमण वाढेल. त्यात ज्या लोकांना याआधीच आजार आहे अशांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या वाढेल आणि मृत्यूचे आकडेही वाढण्याची शक्यता असल्याचं WHO अधिकारी म्हणाले.9 / 10ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे युरोपात चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये मंगळवारी ओमायक्रॉन संक्रमणाच्या लाटेमुळे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कारण ब्रिटनमध्ये एकाच दिवशी पहिल्यांदा २ लाखाहून अधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. 10 / 10मागील २४ तासांत भारतात कोरोनाचे ९० हजाराहून जास्त रुग्ण आढळले. एक दिवसापूर्वी आढळलेल्या रुग्णांपैकी हा दुप्पट आकडा आहे. ओमायक्रॉन रुग्णांमध्ये वाढ होत २६३० रुग्ण समोर आले. त्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications