coronavirus omicron variant carriers can infect up to seven days like delta strain
Omicron Variant : टेन्शन वाढलं! Omicron बाबत नवा खुलासा; पॉझिटिव्ह रुग्ण डेल्टाप्रमाणे 7 दिवसांत पसरवू शकतो संसर्ग By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 4:33 PM1 / 15जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्य़ा व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. 2 / 15ओमायक्रॉन सब व्हेरिएंट BA.2 जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. युरोप, चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया या देशांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत, ओमायक्रॉन व्हेरियंटच्या संक्रमण क्षमतेबाबत एक नवीन खुलासा करण्यात आला आहे. 3 / 15संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्णही अनेक दिवस इतरांमध्ये संसर्ग पसरवू शकतो. आत्तापर्यंत असा दावा केला जात होता की मागील व्हेरिएंटच्या तुलनेत याचा ट्रान्समिशन कालावधी कमी आहे. 4 / 15डच व्हायरोलॉजिस्ट डॉ. मेर्जोलीन इरविन-नोस्टर हे मानायला तयार नाहीत की ओमायक्रॉन पॉझिटिव्ह लोकांचा इतरांना पॉझिटिव्ह करण्याचा कालावधी कमी असतो. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाब, 4 ते 7 दिवस संसर्ग पसरतो असं म्हटलं होतं. 5 / 15Omicron प्रकारातही असं घडल्यास नवीन टेन्शन निर्माण होऊ शकतं. चिंतेची बाब म्हणजे अनेक देशात या व्हेरिएंटला हलक्यात घेऊन आयसोलेशनचा कालावधी हा कमी करण्यात आला आहे. 6 / 15रिसर्चनुसार, लक्षणे दिसण्यापूर्वी दोन दिवस आधी आणि 7 दिवसांनंतर Omicron इतरांमध्ये पसरू शकतो. डेली मेलच्या वृत्तानुसार, डॉ. मर्जोलिन यांनी अनेक प्रयोगशाळेतील अभ्यासांचा हवाला देत सात दिवस टिकून राहण्याच्या धोक्याबद्दल सांगितले आहे.7 / 15एका वैद्यकीय परिषदेच्या माध्यमातून जगभरातील देशांना संदेश देणार आहेत की जर क्वारंटाइनची वेळ कमी केली तर नवीन प्रकार पुन्हा हवेत पसरू शकतो. ओमायक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरतो. 8 / 15BA.2 हे Omicron उप-प्रकार BA.1 पेक्षा अधिक प्रगत आहे. त्यामुळेच आरटी-पीसीआरमध्येही त्याचा मागोवा घेणे अवघड आहे. अशा परिस्थितीत जर जगातील देशांत आयसोलेशनचा कालावधी कमी झाला तर महामारी पुन्हा भयंकर स्वरूप धारण करू शकते.9 / 15वेल्समधील सहा दिवसांच्या तुलनेत स्कॉटलंडमधील लोकांना अजूनही किमान एक आठवडा आयसोलेट होणं आवश्यक आहे. यूके बाहेर नॉर्वेमध्ये चार दिवस आणि जर्मनीमध्ये 10 दिवस आयसोलेशनचा कालावधी आहे.10 / 15डॉ. इरविन म्हणतात की सात दिवसांचा आयसोलेशन कालावधी सर्व बाबतीत सुरक्षित असावा. तथापि, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सात दिवसांनंतर खोकला आणि शिंका येणे यासारख्या श्वसनाच्या समस्या असल्यास 10 ते 14 दिवस आयसोलेशन ठेवावे. 11 / 15ज्या लोकांना विषाणूचा गंभीर संसर्ग झाला आहे ते बराच काळ संसर्ग पसरवू शकतात, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप कमकुवत आहे, ते अनेक महिने व्हायरस पसरवत राहू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे.12 / 15जर नवीन व्हेरिएंट आपल्याला गंभीरपणे आजारी करत असेल तर पुन्हा आयसोलेशन कालावधी वाढवण्याची गरज आहे जो किमान सात दिवसांचा असावा असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 15कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 47 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 474,693,807 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 6,122,433 जणांचा मृत्यू झाला आहे.14 / 15कोरोनाने चिमुकल्यांना देखील आपल्या जाळ्यात ओढलं आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. अमेरिकेत गेल्या महिन्याभरात जवळपास 2 लाख 70 हजार लहान मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत.15 / 15'सिन्हुआ' वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, देशात गेल्या दोन वर्षांच्या काळात जवळपास 1.28 कोटी मुलं कोरोना संक्रमित आढळली आहेत. रिपोर्टनुसार, 19 टक्के मुलं करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या चार आठवड्यांत जवळपास 270000 कोरोना संक्रमित लहानग्यांची नोंद करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications