शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Record: एका दिवसात जगात १६ लाख कोरोना रुग्ण, ७ हजार मृत्यू; अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनमध्ये सर्व रेकॉर्ड मोडीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 4:59 PM

1 / 9
गेल्या २४ तासांत संपूर्ण जगात एकूण मिळून १६ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) डेल्टाच्या प्रकोपावेळीच ओमायक्रॉनचं संकट आल्यानं संसर्गाचा त्सुनामी आला असल्याचं मान्य केलं आहे.
2 / 9
गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये ११ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली असल्याचं डब्ल्यूएचओनं सांगितलं. तसंच २० ते २६ डिसेंबर या काळात जवळपास ५० लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या युरोप खंडात आढळले आहेत.
3 / 9
worldometers.info च्या माहितीनुसार काल दिवसभरात जगात एकूम १६.१३ लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ७३९१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ज्या दिवसापासून कोरोना महामारी सुरू झाली तेव्हापासूनचा आजवरचा हा सर्वाधिक आकडा असल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे.
4 / 9
जॉन हॉप्किन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत बुधवारी रेकॉर्ड ब्रेक २ लाख ६५ हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याआधी ११ जानेवारी रोजी २.५२ लाख रुग्ण आढळून आले होते. ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे अमेरिकेत अनेक हवाई उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत.
5 / 9
युकेच्या आकडेवारीनुसार बुधावारी १.८३ लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जो युकेसाठी आजवरचा सर्वाधिक आकडा आहे. तर एकाच दिवसात ५७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
6 / 9
फ्रान्समध्येही कोरोनाची त्सुनामी आल्याचं पाहायाल मिळत आहे. फ्रान्समध्ये बुधवारी रेकॉर्ड ब्रेक २.०८ लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर मंगळवारी हाच आकडा १.८० लाक इतका होता. फ्रान्समध्ये दर एका सेंकदाला दोन नवे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री ओलिवियर वेरन यांनी दिली.
7 / 9
युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित होत आहे. अर्जेंटिनामध्ये बुधवारी ४२ हजार ०३२ रुग्ण आढळून आले होते. तर इटलीमध्ये बुधवारी ९८ हजार ०३० नवे रुग्ण आढळून आले आहेत.
8 / 9
डेल्टा आणि ओमायक्रॉननं रुग्णवाढीची त्सुनामी येत असली तरी २०२२ च्या अखेरीस कोरोना महामारीवर आपण नियंत्रण मिळवलेलं असेल असा विश्वास WHO चे प्रमुख टेड्रोस गेब्रेयेसस यांनी व्यक्त केला आहे. ओमायक्रॉन सौम्य स्वरुपाचा विषाणू असल्याचा दावा करणं सध्या खूप घाईचं ठरेल असंही ते म्हणाले.
9 / 9
२०२२ च्या अखेरीस संपूर्ण जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के जनतेचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल त्यामुळे कोरोनावर आपण बऱ्यापैकी नियंत्रण प्राप्त केलेलं असेल असं टेड्रोस म्हणाले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लस