coronavirus outbreak vietnam stared rice atm for needy people SSS
Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 10:23 AM1 / 13जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.2 / 13लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना पुरेसे अन्न मिळत नसल्याचं चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एक अनोखी गोष्ट समोर आली आहे.3 / 13लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत करण्यासाठी एका देशाने लोकांसाठी अनोखी सोय केली आहे. 4 / 13ATM चा वापर हा प्रामुख्याने पैसे काढण्यासाठी केला जातो. मात्र जर कोणी एटीएममधून पैसे नाही तर तांदूळ येणार असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे.5 / 13व्हिएतनाम असं या देशाचं नाव असून या देशाने लोकांना अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी राईस एटीएम सुरू केले आहे. 6 / 13राईस एटीएम दिवसभर सुरू राहणार असून यामधून बँकेच्या एटीएमप्रमाणे लोकांना तांदूळ काढता येणार आहेत. 7 / 13व्हिएतनाममधील एका व्यावसायिकाने पुढाकार घेऊन देशातील लोकांना मदत करण्यासाठी राईस एटीएम मशीन बसविण्याचा निर्णय घेतला.8 / 13व्हिएतनाममध्येही कोरोनाचे अनेक रुग्ण असून तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 262 आहे. 9 / 1331मार्चपासून तिथे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन सोबतच तेथील लोक सोशल डिस्टेंसिंगचं देखील पालन करत आहेत. 10 / 13एका व्यक्तीला साधारण मशीनमधून 2 किलो तांदूळ मोफत मिळत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.11 / 13राईस एटीएममधून तांदूळ घेण्यासाठी हात सॅनिटाझरने स्वच्छ करणं आवश्यक आहे. (सर्व फोटो - ट्विटर)12 / 13लॉकडाऊनमधील धान्याची समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 13 / 13लॉकडाऊनमधील धान्याची समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications