Coronavirus patients test corona positive after two moths of recovering in china SSS
Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 9:08 AM1 / 12चीनच्या वुहानमधून वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या कोरोनाने आतापर्यंत तब्बल 184,217 लोकांचा बळी घेतला आहे.2 / 12जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजारांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा 1 लाख 84 हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात 7 लाख 17 हजार 635 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. 3 / 12कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिका, इटली, स्पेनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.4 / 12चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. मात्र यावर नियंत्रण मिळवण्यात चीन यशस्वी झाला असून तेथील मृतांची संख्याही कमी झाली आहे.5 / 12कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली असताना पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला असल्याची माहिती मिळत आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.6 / 12कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये तब्बल 2 महिन्यांनी पुन्हा एकदा व्हायरसची लक्षण दिसत असल्याने चीनच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. 2 महिन्यांनंतरही कोरोना व्हायरस शरीरात जिवंत असल्याचं दिसून येत आहे.7 / 12वुहानमधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसून येत आहे. अशा रुग्णांना वुहानमधील एका इंडस्ट्रियल प्लान्टजवळ तयार केलेल्या क्वारंटाइन हबमध्ये ठेवण्यात आले आहे. 8 / 12रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे. मात्र यापैकी एका रुग्णाला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आला होता. तेव्हा त्याची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. 9 / 12कोरोना संसर्ग होऊन रुग्णाला 2 महिने झाले आहेत. ठीक झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.10 / 12चीनमध्ये आता अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. ज्यामध्ये बरा झालेला रुग्ण 50 ते 60 दिवसांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह होत असल्याचं दिसत आहे.11 / 12चीनने कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले असले तरी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत असल्याने चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.12 / 12अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, चीन, इराण, तुर्की, बेल्जियम, ब्राझिल, कॅनडा, नेदरलँड, स्वित्झर्लंड, रशिया, पोर्तुगाल, आयर्लंड आणि भारतातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications