CoronaVirus Relaxation in lockdown; patients increased in ‘these’ countries hrb
CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 3:34 PM1 / 14कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविताना नागरिकांसाठी सूट दिली आहे. दारुच्या दुकानांसह एकाच रांगेतील पाच अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरु ठेवण्यात येणार आहेत. यामुळे आज पहाटेपासूनच लोकांच्या रांगा ठिकठिकाणी दिसून येत होत्या. 2 / 14भारताप्रमाणेच अन्य देशांनीही लॉकडाऊनमध्ये सूट दिली होती. मात्र, या देशांना त्याची किंमत मोजावी लागली आहे. 3 / 14जगभरातील या मोठ्या लोकसंख्येच्या देशांनी सूट दिल्याने लाखो लोक रस्त्यावर आले होते. यामुळे रविवारी एकाच दिवशी किरोना बाधितांचा आकडा कमालीचा वाढलेला दिसून आला आहे. 4 / 14चीननंतर जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असेलेल्या भारतात काल २६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. रशियामध्ये पहिल्यांदाच नवीन रुग्णांचा आकडा १०००० पार पोहोचला आहे. 5 / 14ब्रिटेनमध्ये मृत्यूंचा आकडा इटलीच्या आकड्याजवळ जाऊन ठेपला आहे. इटलीमध्ये कोरोनाला आवर घालण्यात आला असताना आता युरोपचे नवे केंद्र ब्रिटन बनले आहे. 6 / 14धक्कादायक म्हणजे ब्रिटनची लोकसंख्या इटलीपेक्षा कमी आहे आणि त्यांच्याकडे महामारीशी लढण्यासाठी पुरेसा वेळही होता. 7 / 14चीन मीडियानुसार १७ लाख लोक बिजिंगमधील विविध पार्कमध्ये पोहोचले होते. तर शांघायच्या मुख्य पर्यटन केंद्रांमध्ये १० लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. 8 / 14इटलीमध्ये रविवारी १७४ जणांचा मृत्यू झाला. १० मार्चला लॉकडाऊन सुरु झाला होता. त्यानंतरचा हा आकडा सर्वात कमी आहे. पार्क आणि उद्याने आजपासून सामान्य लोकांसाठी उघडण्यात येणार आहेत. 9 / 14चीनमध्ये पाच दिवसांच्या काळात पर्यटनाला परवानगी देण्यात आली होती. यामुळे लोकांनी तोबा गर्दी केली होती. तिकडे कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. 10 / 14स्पेनमध्ये १४ मार्चला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे लोक मोठ्याप्रमाणावर बाहेर पडले होते. परंतू त्यांनी सामाजिक दूरीचे नियम पाळले होते. 11 / 14सर्वात मोठा धोका आता अफगाणिस्तानमध्ये जाणवू लागला आहे. राजधानी काबुलमध्ये पूर्वसूचना न देता ५०० लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये ३० टक्के लोकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 12 / 14सर्वात मोठा धोका आता अफगाणिस्तानमध्ये जाणवू लागला आहे. राजधानी काबुलमध्ये पूर्वसूचना न देता ५०० लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये ३० टक्के लोकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 13 / 14ब्रिटेनमध्ये लॉकडाऊन हटविण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यावर दबाव वाढू लागला आहे. लॉकडाऊन गुरुवारपर्यंत असणार आहे. मात्र, आजही शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. 14 / 14ब्रिटेनमध्ये लॉकडाऊन हटविण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यावर दबाव वाढू लागला आहे. लॉकडाऊन गुरुवारपर्यंत असणार आहे. मात्र, आजही शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications