coronavirus: release of corona negative patient could be dangerous, WHO warns BKP
coronavirus : कोरोनामुक्त रुग्णांना मोकळीक देणे ठरू शकते धोकादायक, WHO चा गंभीर इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 1:47 PM1 / 10कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरातील बहुतांश अर्थव्यवस्थाना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या नुकसानीतून सावरण्यासाठी अनेक देशांमध्ये इम्युनिटी पासपोर्ट आणि जोखीम मुक्त सर्टिफिकेटच्या आधारावर लॉकडाऊनमध्ये सवलत देण्याचा विचार सुरू आहे. मात्र असे करणे संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकते, असा गंभीर इशारा WHO ने दिला आहे.2 / 10- WHO ने सांगितले की जगभरात कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा कोरोना होणार नाही असे समजणे चुकीचे ठरेल.3 / 10इम्युनिटी पासपोर्ट, जोखीम मुक्त सर्टिफिकेटसारखे प्रकार कोरोनाच्या धोक्यात भर घालतील. तसेच इम्युनिटीबाबत काळजी घेणे लोक बंद करतील, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.4 / 10जगभरात आतापर्यंत सुमारे साडे 29 लाख पेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दोन लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनातून सावरलेल्या रुग्णांमध्ये अँटीबॉडी विकसित होत असल्याचा आणि त्यांच्यावर पुन्हा कोरोनाचा हल्ला होत नसल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नसल्याचे WHO ने म्हटले आहे.5 / 10मात्र कोरोनाबाधितांच्या बहुतांश प्रकरणांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोना झाला नसल्याचे समोर आले आहे. तसेच या लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्याचे दिसून आले आहे.6 / 10तसेच शरीरात असलेले टी-सेल्ससुद्धा कोरोनाचे संक्रमण झालेल्या सेल्सशी लढण्यात उपयुक्त ठरत आहेत. मात्र शरीरात विकसित झालेली रोगप्रतिकारशक्ती पुढेसुद्धा या आजाराशी लढण्यास मदत करेल, याबाबत संशोधकांकडून अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही.7 / 10कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगभरात लागू करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे ही कुठल्या ना कुठल्या अभ्यासावर आधारित आहेत. मात्र या विषाणूबाबत रोज नवी माहिती समोर येत असल्याने कोरोनाबाबतच्या सुचनांमध्ये रोज नवे बदल होत आहेत.8 / 10- त्यामुळे सर्व देशांनी कोरोनाचा धोका टळण्यापूर्वी कोसळत असलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी नियम बनवणे टाळले पाहिजे. ज्या लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाली आहे. त्यांना इम्युनिटी पासपोर्ट देणे धोकादायक ठरू शकेल, असे WHO ने म्हटले आहे.9 / 10गेल्याच आठवड्यात चिली सरकारने कोरोनामधून सवरलेल्या लोकांसाठी हेल्थ पासपोर्ट जारी करण्याचे संकेत दिले होते.10 / 10चिलीप्रमाणेच स्वीडननेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर नियम लागू केलेले नाहीत. बंधनात राहणाऱ्या लोकांपेक्षा बाहेर राहणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता जास्त चांगली असते, असा दावा या देशातील शास्त्रज्ञांनी केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications