शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: ‘या’ मास्कच्या संपर्कात येताच कोरोना व्हायरस नष्ट होणार; संशोधनाला मिळणार यश?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 8:54 AM

1 / 11
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील १९० हून अधिक देशांना विळख्यात ओढलं आहे. आतापर्यंत ४८ लाखाहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखाहून जास्त मृत्यू झाले आहेत.
2 / 11
कोरोनामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन सुरु केलं आहे. पण अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्यांना, आरोग्य कर्मचारी यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे.
3 / 11
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पीपीई किट्स, मास्क घालणे बंधनकारक आहे. कारण हा व्हायरस संसर्गजन्य असल्याने कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीमुळे अनेकांमध्ये तो पसरण्याची शक्यता असते.
4 / 11
काही देशांनी मास्क न घालणाऱ्यांना शिक्षेची तरतूदही केली आहे. एका देशात मास्क न घातल्यास तुम्हाला ३ वर्ष जेलची हवा खावी लागू शकते.
5 / 11
अमेरिकेच्या केंटकी विद्यापीठातील वैज्ञानिक एक असा वैद्यकीय फेस मास्क तयार करण्याचे काम करत आहेत ज्यामुळे संपर्कात येणाऱ्या कोरोना विषाणूचा नाश होईल.
6 / 11
डेली मेलच्या अहवालानुसार, मास्कच्या मेंब्रेनमध्ये एंजाइम्स असतील जे कोरोना विषाणूचा नाश करतील.
7 / 11
मास्कच्या मेब्रेनमध्ये असणारे एंजाइम्स कोरोना व्हायरसच्या एस प्रोटीनसोबत जोडले जातील आणि त्यामुळे कोरोना विषाणूचा खात्मा होईल.
8 / 11
हा मास्क पातळ आणि नॉन टॉक्सिसदेखील असेल. विषाणूचा शोध घेतल्यानंतर त्याचा रंगही बदलेल. त्यामुळे माणसाला याची माहिती मिळेल.
9 / 11
केंटकी विद्यापीठात मास्क तयार करण्याच्या कामात गुंतलेल्या या टीमला ते तयार करण्यासाठी नॅशनल सायन्स फाउंडेशन कडून एक कोटी १३ लाखांचे अनुदान मिळाले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा मास्क तयार करण्यास सहा महिने लागू शकतात.
10 / 11
जर हा मास्क यशस्वी झाला तर जगभरातील आरोग्यसेवा कर्मचारी प्रथम त्याचा वापर करू शकतात. कोरोना रुग्णांच्या उपचारादरम्यान, आरोग्यसेवा कामगारांना रोज या विषाणूचा धोका असतो. जगातील अनेक देशांमध्ये पीपीईचा तुटवडादेखील आहे.
11 / 11
केंटकी विद्यापीठातील रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक दिबाकर भट्टाचार्य म्हणाले की, आमच्याकडे एक विशेष मेंब्रेन तयार करण्याची क्षमता आहे जी एन ९५ मास्कसारखे व्हायरस काढून टाकेल आणि नंतर ती पूर्णपणे निष्क्रिय करेल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या