शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: कोरोनाची दुसरी लाट, या देशाने केली ४२ दिवसांच्या कडक राष्ट्रीय लॉकडाऊनची घोषणा

By बाळकृष्ण परब | Published: October 20, 2020 2:41 PM

1 / 5
कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही महिन्यांपासून सातत्याने घट दिसून आल्यानंतर आता युरोपमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आयर्लंडने आता सहा आठवड्यांसाठी राष्ट्रीय लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आज मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. यापूर्वी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इस्राइलने लॉकडाऊनची घोषणा केली होती.
2 / 5
डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार आयर्लंडमध्ये पुढच्या सहा आठवड्यापर्यंत युरोपमधील सर्वात कठोर लॉकडाऊन लागू राहणार आहे. मात्र देशात गेल्या २४ तासांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. सरकारने सांगितले की, येणाऱ्या आठवड्यातील संभाव्य धोका विचारात घेऊन लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे.
3 / 5
लॉकडाऊनदरम्यान आयर्लंडमध्ये १ डिसेंबरपर्यंत लोकांच्या मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यावर निर्बंध लागू असतील. बहुतांश उद्योग बंद असतील. तसेच सामान्य नागरिकांना घरापासून केवळ ५ किमी अंतरापर्यंतच फिरण्याची मुभा असेल.
4 / 5
लॉकडाऊनदरम्यान अंत्यसंस्कारासाठी १० जण आणि विवाहासाठी २५ जणांना एकत्र येण्याची परवानगी असेल. तसेच पब, रेस्टॉरंट्स आणि कॅफेमधून केवळ डिलीव्हरी आणि टेकअवेची सुविधा उपलब्ध असेल.
5 / 5
मात्र या लॉकडाऊनदरम्यान आयर्लंडने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारने जनतेला आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. आयर्लंडची लोकसंख्या सुमारे ५० लाख असून, येथे आतापर्यंत कोरोनाचे ५१ हजार रुग्ण सापडले आहेत. तसेच १८५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIrelandआयर्लंडInternationalआंतरराष्ट्रीय