शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : भारत आणि पाकिस्तानातील मृतांच्या आकडेवारीबाबत रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 1:34 PM

1 / 9
कोरोना व्हायरसने भारतासह पाकिस्तानातही थैमान घातलं आहे. भारतात चौथ्यांदा लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोना व्हायरसच्या केसेस वेगाने वाढत आहेत. तर तिकडे पाकिस्तानमध्येही कोरोनाने लोक हैराण झाले आहेत. (Image Credit : livemint.com)
2 / 9
आता एका रिसर्चमधून असा अंदाज लावण्यात आला आहे की दोन्ही देशात कोरोना व्हायरस याच वेगाने वाढत राहिला तर ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनाने जीव जाणाऱ्यांची संख्या 34 हजार आणि पाकिस्तानात 5 हजार हजारांचा आकडा पार होईल. (Image Credit : NDTV)
3 / 9
अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंडचे संक्रमण रोग तज्ज्ञ फहीम यूनूस यांच्यानुसार, भारत आणि पाकिस्तानात कोरोना व्हायरसच्या केसेस सतत वाढत आहेत.
4 / 9
जर याप्रमाणेच दोन्ही देशात आकडे वाढत राहिले तर 4 ऑगस्टपर्यंत कोरोना व्हायरसने जीव जाणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढेल. त्यांनी अंदाज लावला आहे की, 4 ऑगस्टपर्यंत भारतात कोरोनामुळे 34, 155 लोकांचा जीव जाऊ शकतो.
5 / 9
सध्याच्या स्थितीवर नजर टाकली तर भारतात लॉकडाउेन 4 मध्ये कोरोनाच्या केसेस वेगाने वाढत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून रोज नव्या 4 हजार केसेस समोर येत आहेत.
6 / 9
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकेडवारीनुसार, देशात कोरोनाने पीडितांची संख्या 1,18,447 आहे तर 48 हजार 534 लोक या आजारातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 3,583 लोकांचा याने जीव घेतला आहे.
7 / 9
यूनूस यांनी सांगितले की, पाकिस्तानातही 4 ऑगस्टपर्यंत कोरोनाने 5332 लोकांचा मृत्यु होऊ शकतो. पाकिस्तानात यावेळी कोरोनाच्या 50, 694 केसेस समोर आल्या आहेत. तर याने 1066 लोकांचा जीव गेला आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात कोरोनाच्या सर्वाधिक केसेस समोर आल्या आहेत.
8 / 9
जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे 334,680 लोकांचा जीव घेतला आहे. ब्राझील या महामारीचं नवं केंद्र बनला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसने मरणाऱ्यांची संख्या 20 हजाराच्या पुढे गेली आहे. ब्राझील लॅटीन अमेरिकेत कोरोनाचं केंद्र बनला आहे. (Image Credit : dw.com)
9 / 9
इथे एका दिवसात 1,188 लोकांचा जीव गमावला. त्यानुसार जीव गमावणाऱ्यांची एकूण संख्या 20,047 इतकी झाली आहे. ब्राजीलमध्ये कोरोनाने संक्रमित 3,10,000 पेक्षा अधिक केसेस समोर आल्या आहेत. (Image Credit : thehindu.com)
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यResearchसंशोधनAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान