coronavirus Trumps 200 ventilators for India cost 2.6 million dollar kkg
Coronavirus: ट्रम्प २०० व्हेंटिलेटर दान(?) करणार; भारताला 'इतकी' किंमत मोजावी लागणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 2:24 PM1 / 11कोरोनाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारताच्या पाठिशी उभा असून व्हेंटिलेटर दान करणार असल्याचं ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. 2 / 11ट्रम्प यांनी मदतीचा हात पुढे केल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगचेच ट्विट करुन त्यांचे आभार मानले.3 / 11कोरोना संकटकाळात आपण एकत्र काम करू. यामुळे भारत-अमेरिकेची मैत्री आणखी घट्ट होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 4 / 11अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करणार असल्याचं ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे अर्थातच यासाठी भारताला पैसे मोजावे लागणार नाहीत, असं अनेकांना वाटलं. 5 / 11ट्विट केल्यानंतर ट्रम्प यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी भारत भेटीचा उल्लेख केला. मोदी माझे चांगले मित्र असल्याचंदेखील ते म्हणाले.6 / 11ट्रम्प यांच्या ट्विटमुळे, त्यांनी मोदींना खूप चांगला मित्र म्हटल्यानं अमेरिका मित्रत्वाच्या भावनेनं भारताला मदत करत असल्याचा अनेकांचा समज झाला.7 / 11मात्र अमेरिका भारताला व्हेंटिलेटर मोफत देणार नसून एका व्हेंटिलेटरसाठी जवळपास दहा लाख रुपये आकारले जाणार असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं आहे.8 / 11अमेरिकेकडून मे महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या सुरुवातीला व्हेंटिलेटर येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 9 / 11अमेरिका भारताला मोबाईल व्हेंटिलेटर देणार असून एका व्हेंटिलेटरसाठी भारताला १३ हजार अमेरिकन डॉलर (९.६ लाख रुपये) मोजावे लागतील. यामध्ये वाहतूक खर्च धरण्यात आलेला नाही.10 / 11अमेरिका भारताला २०० व्हेंटिलेटर पाठवणार आहे. त्यासाठी भारताला २.६ मिलियन अमेरिकन डॉलर मोजावे लागणार आहेत. याशिवाय वाहतूक खर्चदेखील द्यावा लागेल.11 / 11देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या जवळ पोहोचला आहे. तर अमेरिकेतला कोरोना रुग्णांचा आकडा १५ लाखांच्या पुढे गेला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications