CoronaVirus two Britain nurses fight with corona till last breath, serve for nation hrb
CoronaVirus कोरोनाशी झुंज! अशा काही नर्स ज्यांनी रुग्णांची सेवा करत अखेरचा श्वास घेतला By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 1:03 AM1 / 12जगात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. या कठीण काळात, असे काही लोक आहेत जे या जागतिक साथीच्या विरोधात ठामपणे उभे राहिले आहेत. अशा व्यक्तींना कोरोनाचे योद्धा म्हटले गेले तर ते चुकीचे ठरणार नाही.2 / 12आम्ही डॉक्टर आणि परिचारिकांबद्दल बोलत आहोत जे कोरोना रुग्णांच्या सुरक्षेसाठी 24 तास सेवा देत आहेत. त्यापैकी बर्याच जणांनी आपला जीव गमावला आहे. अशाच दोन ब्रिटिश नर्स आहेत ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णांची काळजी घेतली. भारतातही मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये नर्सना कोरोना झाला आहे.3 / 12जगात कोरोना विषाणू आगीसारखा पसरत आहे, युरोपमध्ये आतापर्यंत या महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या युरोपमधील परिस्थिती पूर्वीसारखी गंभीर दिसत नाही, परंतु ती पूर्णपणे नियंत्रणाखालीही नाहीय. सैफी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.4 / 12चीनमधील कोरोना विषाणू आता जगभर पसरला आहे. कोरोनामुळे पूर्वी इटली, स्पेन, युके अशा देशांची आरोग्य यंत्रणा कोलमडली होती.5 / 12ब्रिटनमध्ये कोरोनाच्या ३००० हून अधिक रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. 6 / 12तेथील परिस्थिती गंभीर आहे. अतिरिक्त कामाचा ताण असूनही, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी ब्रिटनमध्ये रात्रभर सेवा देत आहेत.7 / 12कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेताना दोन ब्रिटीश परिचारिका कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मरण पावल्या. या दोन्ही नर्सचे त्यांच्या मुलांवर खूप प्रेम होते. 8 / 12कोरोनाची लागण झाल्याने केंट मार्गेटच्या हॉस्पिटलमध्ये सेवा देत असलेल्या एमी ओरॉकचा मृत्यू झाला.9 / 12अॅमी गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची सेवा करत होती. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळली होती.10 / 12अॅमीच्या मृत्यूनंतर काही तासांतच, आणखी एक ब्रिटीश नर्स अरिमा नसरीनच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना हादरवून सोडले.11 / 12अरिमा यांनी वलसाल मॅनरच्या वेस्ट मिडलँड हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. अरिमा ज्या वॉर्डात सेवा देत होती, उपचारादरम्यान त्याच वॉर्डमध्ये तिचा मृत्यू झाला.12 / 12अरिमा नसरीन गेली ३ वर्षे वैद्यकीय सेवा देत होती. मार्चच्या शेवटी, तिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे उघड झाले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications